pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्रीमती.जे.बी.के, नवभारत विद्यालयाची विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी.

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.6

टेंभुर्णी. येथील नवभारत शिक्षण संस्थेच्या श्रीमती.जे.बी.के विद्यालय व नवभारत उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर होणा-या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन, विजयी घोडदौड व क्रीडा स्पर्धांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे. जाफ्राबाद येथे “तालुका क्रीडा अधिकारी जाफ्राबाद” यांच्या वतीने”तालुका स्तरावरील “शालेय क्रीडा स्पर्धा” -२०२३-२४चे आयोजन मोठ्या उत्साहात होत आहे.नुकत्याच झालेल्या मैदानी स्पर्धेत ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत- वयोगट १९ वर्षा खालील- राहुल सुरेश कावळे, या खेळाडुने प्रथम क्रमांक पटकावला, तर ८००-मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. उंच उडी स्पर्धेत- ऋषिकेश संजय नवले यांने प्रथम क्रमांक पटकावला असुन, भालाफेक क्रीडा स्पर्धांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत- विशाल भगवान शेळके याने, द्वितीय क्रमांक पटकावला आहे. “तिहेरी उडी” व “थाळी फेक” क्रीडा प्रकारात ओमराज कृष्णा उखर्डे याने “प्रथम क्रमांक” पटकावला असुन, गोळा फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. फैजान मुजीब शेख या क्रीडा पटुने “लांब उडी” स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अक्षय नवले याने “हॅमर थ्रो” क्रीडा प्रकारात-द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ४×१०० मीटर “रिले स्पर्धेत” १९वर्ष वयोगटातील -ओमराज उखर्डे,अक्षय नवले, ऋषिकेश नवले, राहुल कावळे, सय्यद मुख्तार मुश्ताक यांनी “प्रथम क्रमांक” पटकावला आहे. या सर्व विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच वयोगट १७ वर्षे यात- गौरव शिवहरी खरात, यांने- गोळा फेक क्रीडा स्पर्धांमध्ये- “प्रथम क्रमांक” पटकावला आहे. ‘भालाफेक’ क्रीडा स्पर्धांमध्ये-ओम शांताराम पवार, याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. उंच उडी स्पर्धेत-ओम ज्ञानेश्वर व्यवहारे, याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. सुदर्शन भोरे या क्रीडा पटुन- “लांब उडी” स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे, तसेच -धिरज नंदु शेजुळ याने -तिहेरी उडी स्पर्धेत- प्रथम क्रमांक,व ११० मीटर अडथळा धावण्याच्या स्पर्धेत-द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ४×१००मीटर रिले स्पर्धेत-सूदर्शन भोरे, धिरज शेजुळ,ओम पवार,ओम व्यवहारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. वयोगट १४ वर्षाखालील-कुणाला जितेंद्र छडिदार, याने २०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत,द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व विजयी खेळाडूंची जिल्हा स्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे, या सर्व विजयी विद्यार्थी खेळाडूंना क्रीडा शिक्षक -राजेश शेवाळे, कैलास भुतेकर यांचे मार्गदर्शन लाभले असुन, या सर्व विजयी खेळाडूंचे नवभारत शिक्षण संस्थेचे-अध्यक्ष. संजय काबरा, उपाध्यक्ष शेख जमिर सर,सचिव- सत्यनारायण सोनी, जेष्ठ संचालक- मधुकर निकम, संस्थेचे पदाधिकारी सुभाष राठी, रामनारायण काबरा, गोविंद काबरा, ॲड.प्रेमसुख काबरा, माजी अध्यक्ष. सुरेश काबरा,संचालक विष्णूभाऊ सांगुळे, संचालक. प्रदीप काबरा, प्रा.दत्ताराव देशमुख, प्राचार्य. भास्कर चेके, उपप्राचार्य.मधुकर झटे, उपमुख्याध्यापक. नंदकुमार काळे, पर्यवेक्षक.पंजाबराव सोळंके, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख- एस.बी. बोरकर, संजय कुलकर्णी, गणेश सावसक्के, धनंजय पुराणे, रमेश इंगळे, विष्णू जाधव, संजय व्ही कुलकर्णी,भिवसन ससाणे, समाधान कांबळे,सि.डी.ऊखर्डे, दत्ता उखर्डे,प्रा.सुनिल बनसोडे,प्रा.अरूण आहेर, सुनिल सकुंडे,राजेंद्र जगताप, रवींद्र मोरे,प्रा.रामदास भांगे,प्रा.गजानन धोटे, वासुदेव क्षिरसागर,प्रा.कैलास जाधव,प्रा.आनंद जाधव, उज्ज्वला आवटी, माधुरी पाटील, फिरदौस शेख, मंजुषा भिलावेकर, ज्योतीताई जाधव, विजया शिल्लार, राजुभाऊ डोमळे, नागोराव देशमुख,दगडूबा तांबेकर, दिपक देशमुख, या सर्वांनी अभिनंदन केले आहे.व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे