pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6

सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग / व्यवसाय / महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद / पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई- आर 1 माहे सप्टेंबर, २०२३ तिमाही संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत (३१ ऑक्टोबर, २०२३ सादर करणे बंधनकारक आहे.
या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र पर्यंत) सादर www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची सप्टेंबर २०२३ या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर १ दि. ३१ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन, एम्प्लॉयर वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर १ या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनीक सुटया वगळून सकाळी १०.०० ते सांयकाळी ६.०० वाजेपर्यंत (०२४८२) २९९०३३ या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा. सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० मधील तरतुदी नुसार वरील प्रमाणे सर्व आस्थापनांनी सप्टेंबर, २०२३ या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहीती ई-आर १ विवरणपत्र ३१ ऑक्टोबर, २०२३ पुर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे