pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जय मल्हारच्या गजरात शिरनेर येथे लाक्षणिक उपोषण

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अंबड /प्रतिनिधी,दि.8

महाराष्ट्रातील धनगर समाज अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शिरनेर ता.अंबड येथे दि.8 रोजी सकाळपासून लाक्षणिक उपोषण आंदोलन यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात सुरू करुन आंदोलकांनी शिरनेर गावात प्रभातफेरी काढून आरक्षण आमच्या हक्काचे-नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा दिल्या.दुपारी राष्ट्रवादीचे बबलु चौधरी,माजी उपनगराध्यक्ष केदार कुलकर्णी,भगवान माथेले रामभाऊ लांडे,बळीराम खटके,भास्कर कोल्हे,अनिल भालेकर यांनी आंदोलनात सहभागी होवून आंदोलनाला पाठिंबा दिला तर माजीमंत्री राजेश टोपे यांनी मोबाईलवर संपर्क साधून आंदोलनात आपण सहभागी असुन धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले.आमदार नारायण कुचे यांनी दुपारी आंदोलनस्थळी हजेरी लावून पाठिंबा दिला.भिवंडी बोडखा,किनगाव,नागोण्याची वाडी,भायगाव,अंबड,बदनापूर,जालना
,वडीगोद्री आदी गावातील बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. मंडळ अधिकारी यांनी आंदोलकांचे शेवटी निवेदन स्विकारले यावेळी पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे