विशेष सखोल निरीक्षण कार्यक्रमांमध्ये बी.एल.ओ यांची भूमिका महत्त्वाची – तहसिलदार लोंढे

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.14
विशेष सखोल निरीक्षण कार्यक्रमांमध्ये बी.एल. ओ. यांची भूमिका महत्त्वाची असून सर्व बी. एल.ओ. यांनी सजगपणे काम करण्याचे प्रतिपादन जाफराबादचे तहसिलदार अविनाश लोंढे यांनी मंगळवारी ता. 6 केले जाफराबाद पंचायत समिती सभागृहात आयोजित बी. एल.ओ च्या तालुकास्तरीय बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार श्री पेरके, संजय खांडेभराड, गौतम गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना श्री लोंढे म्हणाले की निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असून ज्या मतदारांची नावे एका पेक्षा अधिक ठिकाणी समाविष्ट आहेत त्यापैकी एकच नाव कायम ठेवण्यात येऊन त्यापेक्षा जास्त असणारी नावे कमी करण्यात येणार आहेत. विशेष पुनर्ननिरीक्षण कार्यक्रमात बी एल ओ यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असून सगळ्यांनी कार्यक्षमपणे सदर काम पार पाडावे असेही ते म्हणाले. जाफराबाद तहसील चा तहसिलदार पदाचा पदभार नव्याने सांभाळल्याबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने श्री लोंढे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जाफराबाद तालुका अध्यक्ष विनोद कळंबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनंता जंजाळ, संदीप जाधव, दत्तू मुनेमाणिक, अनिल कोल्हे, रामेश्वर पवार यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी आणि सर्व बी.एल.ओ. उपस्थित होते


