सिद्धार्थ महाविद्यालयात बालविवाह मुक्त भारत प्रबोधन कार्यक्रम संपन्न

जाफराबाद/ विशाल देशमुख,दि.14
जाफराबाद येथील सिद्धार्थ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बालविवाह मुक्त भारत प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश देशमुख हे होते तर प्रमुख वक्ते श्रीमती एन.बी.खांडेभराड यांचे मार्गदर्शन लाभले. विचार मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला विकास कक्ष, लैंगिक छळ प्रतिबंध समिती, सखी सावित्री समिती तसेच मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता. यावेळी प्रमुख वक्त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 पूर्वी भारतातील हिंदू विवाह कायद्या अंतर्गत मुलीचे वय 18 वर्ष व मुलाचे वय 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह संमती नव्हती परंतु काही पालक आपल्या मुलांचे बालविवाह लावून देत त्यामुळे बालविवाहाचे दुष्परिणाम समाजात दिसू लागले मुलींच्या आरोग्यावर परिणाम, शिक्षणावर परिणाम तिची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक जडणघडण व्यवस्थित न झाल्यामुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होत होते. त्यामुळे हिंदू विवाह कायदा 1955 यामध्ये सुधारणा करून बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 भारतात सक्तीने लागू करण्यात आला. बालविवाह करणाऱ्या माता,पिता तसेच या विवाह साठी उपस्थित फोटोग्राफर असेल, पत्रिका छपाई करणारा असेल, विवाह साठी उपस्थित असणारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे प्रावधान करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात बालविवाह मुक्त भारत करण्याचे सरकारचे धोरण आहे असे सांगितले.यावेळी उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे यांनीही बालविवाह मुक्त भारत या विषयावर मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.रमेश देशमुख यांनी बालविवाह रोखण्यासाठी भारत सरकारने निर्माण केलेले बालविवाह प्रतिबंधक कायदे तंतोतंत लागू करण्यासाठी ग्रामपातळीवर ग्रामसेवक,सरपंच,अंगणवाडी सेविका,बालविवाह प्रकल्प अधिकारी तसेच जागृत नागरिकांनी सजग राहणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या परिसरात किंवा अवतीभवती जर बालविवाह आढळून आला तर चाइल्ड हेल्पलाइन 1098 या हेल्पलाइनवर संपर्क साधने किंवा पोलीस प्रशासनास कळविणे तसेच तालुका बाल संरक्षण समिती,गाव बाल संरक्षण समिती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात कु.समिक्षा सदानंद हिवाळे (प्रथम) अभिषेक संतोष भारती(द्वितीय)कु.पायल स़ंतोष सोनुने(तृतीय) तर कु.आरती विष्णू इंगळे या विद्यार्थ्यांनीच्या चित्रकलेस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.सदरील चित्रकला स्पर्धेचे परिक्षण प्रा.अनिल वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सारिका जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ.सुनंदा सोनुने यांनी केले तर आभार प्रा.मोहिते एम.सी.यांनी मानले.कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी,विद्यार्थिनी,प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


