सिद्धार्थ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.14
जाफराबाद येथील सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख सर होते.तर
प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्रीमती राजश्री बिरादार होते तर विचार मंचावर उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुनंदा सोनुने यांनी केले.यावेळी प्रमुख वक्ते यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारशील विचारांचा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असलेला महत्त्वपूर्ण वाटा विशद केला. युवकांनी चारित्र्य, आत्मविश्वास व राष्ट्रसेवेच्या मार्गावर चालावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आपल्या मुलाच्या जन्माच्या आधीच आपल्या मुलाचे ध्येय ठरविणाऱ्या एकमेव माता जिजाऊ असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा व जीवनात त्यांची मूल्ये आत्मसात करावीत, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डॉ.सारिका जाधव यांनी केले.तर आभार प्रा.श्रीमती एन बी खांडेभराड यांनी मानले.यावेळी महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने महिला कर्मचाऱ्याचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


