छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्यांची निर्मिती एकाच ठिकाणी करणार!
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने करजगांव येथील गावकऱ्यांनी केला एक आदर्श संकल्प!

जाफराबाद/विशालदेशमुख,दि.14
करजगांव येथे दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केल्या जाते. परंतु अध्याप पर्यंत दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचे काम गांवामध्ये झालेले नाही. याची खंत गांवकर्यांना होती.त्यामुळे अनेक वर्षापासून गांवात दोन्ही महामानवांच्या पुतळ्याची निर्मिती करण्याचे गावकऱ्यांच्या विचाराधीन होते. त्याच अनुषंगाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅंसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने गावकरी एकत्र जमले असता पुतळ्याची निर्मिती एकाच ठिकाणी करण्याचे एकमताने ठरले.ग्रामपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या मोकळ्या जागेमध्ये दोन्ही पुतळ्यांच्या कामाला सुरुवात झाली. गावातील मान्यवरांच्या हस्ते नारळे फोडून उद्घाटन करण्यात आले आहे. यापुढे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण संस्कारानुसार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने गांवामध्ये एकोप्याने सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत.यापुर्वि सिंधखेडराजा प्रमाणे जिजाऊ सृष्टि निर्माण करण्यासाठी सरकारी जमीनीची मागणी करणारा ठराव ग्रामपंचायतिने शासनाकडे पाठवला आहे.राष्ट्रपुरुषाच्या विचाराने प्रेरित होऊन आदर्श ग्राम निर्माण करण्याचे आदर्श समाज निर्माण करण्याचे गावकऱ्यांनी सर्वांनी एकमताने ठरवले आहे.संपुर्ण महाराष्ट्रासाठी हे एक आदर्श उदाहरण ठरणार आहे.यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते नारळे फोडण्यात आली. माजी सरपंच मनोहर पाटील कानडजे, आजी उपसरपंच कैलास पाजगे, गणेश पाटील लोखंडे, सुरेश पाटील बोरसे, विकास साळवे,राजेंद्र बोर्डे,विशाल पाटील कानडजे,समाधान मस्के, संतोष वरपे,रतन गायकवाड, विशाल बोरसे, विनोद पाटील कानडजे, अमोल पाटील कानडजे, यांच्या सह गांवातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.


