pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राज्यसेवा गट-क परिक्षेसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 23

मा. आयुक्त तथा संचालक अध्यक्ष निवड समिती नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्यामार्फत महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा दि. २५  ते २८ ऑक्टोबर 2023 तसेच दि. 2 व  ३ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जे.ई. एस. कॉलेज, जालना या परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे.  परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी  अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
आदेशात नमूद केल्यानुसार फौजदारी दंड संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये नमुद परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राजवळच्या १०० मीटरच्या परीसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ फॅक्स झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परिक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत. हा आदेश वरील परीक्षा कालावधीत सकाळी ८.०० ते सायं ०७.३० वा. पर्यंत अंमलात राहील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे