1160 कोटी दिलेला निधी खर्च झाल्यावर पुढील अनुदानाचा विषय घेणार- शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर
मुंबई/प्रतिनिधी, दि.4
मुंबई येथे 30 ऑक्टोबर पासून शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा 5 वा दिवस होता, गेल्या 5 दिवसापासून शासनाने कोणताही प्रतिसाद दिला नाही,आज मात्र शिक्षण मंत्री महोदयांनी शिष्टमंडळास बोलावून घेतले व चर्चा केली ज्या शाळा 20 टक्के 40 टक्के 60 टक्के अनुदान घेत आहेत त्या शाळांना प्रचलित नियमानुसार 100 टक्के अनुदान मिळाले पाहिजे,अनेकजण सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळे शासन निर्णयानुसार अनुदान देण्याची मागणी केली त्यावर शिक्षण मंत्री म्हणाले की जे 1160 कोटी रुपये दिले आहेत ते अगोदर खर्च होऊ देत अद्याप ही ते पैसे खर्च झाले नाहीत,११६०कोटी दिलेला टप्पा पूर्ण झाला की किती खर्च झाला या नुसार पहीला टप्पा पूर्ण करुन पुढील टप्पा देण्याचे आदेश देण्यात येतील तसा पुढील अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, पण ही बाब शिक्षणाधिकारी यांच्या अधिकारात येते ,तशा सूचना संबंधित अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत,असे सांगितले पण पात्र असून ही अनुदान देण्या ऐवजी काहीतरी त्रुटी काढून अनुदानापासून वंचित ठेवू नका अशी विनंती शिष्टमंडळाने केली त्यावेळी मंत्रीमहोदयानी सांगितले की अशा अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही, उर्वरित निधी खर्ची पडावा यासाठी पुढील काही दिवस देण्यात येतील त्यानंतर निर्णय घेतला जाईल असे सांगितले यावेळी शिक्षक समन्वय संघातील ज्ञानेश्वर शेळके, संतोष वाघ, अनिल परदेशी दिपक कुलकर्णी, योगिता हांडे तसेच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते


