pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शेतामध्ये गांजा लागवड करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.5

जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात दिनांक 04.11.2023 रोजी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे प्रभारी सचिन खामगळ यांना गोपनीय माहीती मिळाली की खानापुर शिवार ता जाफ्राबाद येथे एका इसमाने त्याचे शेतात स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या गांजाच्या झाडांची लागवड करुन त्याचे संवर्धन व जोपासना करीत आहेत अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने याबाबत मा. पोलीस अधिक्षक सो व मा उपविभागीय पोलीस अधिकारी सो भोकरदन यांना रेडबाबत माहीती देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करणेकामी तहसिल कार्यालय सक्षम अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, यांना माहीती देवुन दोन शासकीय पंच असे माहीतीचे ठिकाणी छापा मारला असता खानापुर शिवारातील गट 132 मध्ये शेतकरी इसम ज्ञानदेव भिवसन शिंदे यांनी कपाशीचे शेतात अवैध गांजाची झाडे लागवड करून संवर्धन करीत असतांना मिळुन आल्याने त्यांचे शेतातुन एकुण 70.98 किलो ओला गांजाची 23 झाडे एकुण लक्ष 709800/- रुपये किमतीची जप्त केली आहेत. सदर शेतकरी इसमास ताब्यात घेण्यात आलेले असुन त्यांचे विरुध्द NDPS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री शैलेश बलकवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गणपतर दराडे यांचे मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि सचिन खामगळ, नायब तहसिलदार श्री. आकाश अनिल चव्हाण, कृषी सहायक श्री. विजय जाधव, तलाठी श्री. नारायण डाके, कनिष्ठ सहाय्यक सिध्देश्वर बोर्डे, पोलीस कर्मचारी पंडीत गवळी, गजेंद्र भुतेकर, प्रदीप धोंडगे, सागर शिवरकर, दिनकर चंदनशिवे, अशोक घोंगे, संजय बेडवाल, होमगार्ड रामेश्वर घोडके, राहुल खरात, कैलास दुधाणे, राहुल मघाडे, धम्मदीप आढावे, प्रकाश भुतेकर यांनी केली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे