महाराष्ट्र राज्य परिवहन निगमच्या एस.टी. बसेस मध्ये महिलांसाठी जागा राखिय असतात, मात्र त्यात अट असते की, बस जेथुन निघणार त्या स्टेशन पासुनच 15 मिनीट अगोदर महिलांनी येऊन आपले आसनावर बसावे, मात्र बस एकाच स्टेशनवरुन व दुसन्या बसस्टेशनवर गेल्यावर तेथे महिलांना आरक्षण भेटत नाही व ती गरोदर असली तरी तीला उभे राहुन प्रवास करावे लागते. उदाहरणतः जालना येथुन मुंबईसाठी बस मध्ये फक्त जालना येथेच महिलांना आरक्षण भेटेल व महिलांच्या आरक्षीत जागेवर जर जालना येथे कोणी पुरुष बसले व औरंगाबाद येथे बसल्यास तर तीथे तो पुरुष उठत नाही व महिलांना आरक्षण भेटत नाही. कायम महिलांसाठी जागा आरक्षीत करावी यासाठी प्रयत्न करावे यासाठी अॅड. अश्विनी महेश धनावत यांच्या वतीने अॅड. महेश धनावत यांनी मा. श्रीमती रुपालीताई चाकणकर अध्यक्षा महिला आयोग, महाराष्ट्र राज्य यांना मा. आमदार अरविंद चव्हाण यांच्या सोबत भेटुन निवेदन दिल्यावर कार्यवाही केल्याचे आश्वासन रुपाली चाकणकर यांनी दिले. यावेळी श्री रोहित अग्रवाल सुध्दा उपस्थित होते. यामुळे महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे