pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मातंग व तत्सम पोटजातीतील नावावर शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.7

जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील ज्या व्यक्तींच्या नावे शेतजमीन आहे. अशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयात गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीमधील शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींनी दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे अर्जदाराने स्वत: उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02482 224902 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे