pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य, राष्ट्रीय इंटकचे सचिव महेंद्रशेठ घरत सहकाऱ्यांसह मध्यप्रदेशाला रवाना !

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.10

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य तथा रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्यावर पक्षाने दिलेली जबाबदारी ते लिलया पार पडतात मग ते राज्यस्तरीय अधिवेशन असो वा कोकण विभागीय मेळावा असो. आत्ताच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीला पनवेल व उरण मध्ये घवघवीत यश मिळाले आहे. हेच शुभसंकेत घेवून मध्यप्रदेश येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत हे आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत मध्यप्रदेशला रवाना झाले.

उजैन विधानसभा मतदार संघातून महाकाळ व कालभैरवाचे दर्शन घेवून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. चार दिवस ते इंदोर तसेच भोपाळ येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे प्रचार करणार आहेत. देशभर भाजपा विरोधात लोकांमध्ये असंतोष असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे. सन २०२४ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताबदल अटल असल्याचे प्रचारादरम्यान प्रामुख्याने निदर्शनास येत आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे