[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनीधी,दि.16
जालना येथील प्रसिद्ध शासकीय कंत्राटदार आणि जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे मा.अध्यक्ष आर.आर.खडके पाटील यांच्या पत्नी सौ.शकुंतला खडके(७३)यांचे मंगळवार दि.१४ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.काल बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर येथील रामतीर्थ स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आ.कैलास गोरंटयाल, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी आमदार कल्याणराव काळे,काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,भाजपा जालना विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे,जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह राजकीय, सामाजिक,शैक्षणिक,बांधकाम,आदी क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांसह समाज बांधव,हितचिंतकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.यांच्या पश्चात पती आर.आर.खडके पाटील,मुलगा राजेश खडके पाटील,तीन मुली,सून,नातवंडं असा परिवार आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]


