pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मल्हार महासंघाच्या वतीने श्रीमंत छत्रपती महाराजा यशवंतराव होळकर यांची २४८ वी जयंती उत्साहात साजरी

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.3

आज मोती कारंजा चौक छ.संभाजीनगर येथे जयंती साजरी करण्यात आली व येथे श्रीमंत छत्रपती चक्रवर्ती यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) (यांचा जन्म वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथे ३ डिसेंबर १७७६ म्रुत्यु २८ ऑक्टोबर १८११ भानपुरा मध्यप्रदेश), ते होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू.यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ घ्या खर्ड्याच्या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली ह्या युद्धात यशंवतराव आपले पिता तुकोजीरावासोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला.यशंवत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. त्यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठं राज्य होत. श्रीमंत छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या जयंती निमित्त मल्हार सर्व्हिस मोती कारंजा चौक येथे येऊन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सवात साजरा करण्यात आली.
प्रतिमेचे अभिवादन झाल्यानंतर उपस्थित समाजबांधवांनी यशवंतराव होळकर यांचे विचार समाजासमोर मांडण्याचे काम केले.
आज खरंच आपल्या महापुरुषांची कार्य समाजापुढे आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे” असे प्रतिपादन रामेश्वर लव्हाळे, दिलीप रिठे, संजय फटाकडे, आनिल वाढोणकर आदींची उपस्थिती होती. तसेच आपले विचार मांडले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे