pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उद्योजकांना इग्नाईट महाराष्ट्र इंडस्ट्री गव्हर्नमेंट नेटवर्किंग कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 4

जिल्हा उद्योग केंद्र जालनाकडून सर्वसमावेश परिवर्तन आणि सक्षमीकरणासाठी इग्नाईट महाराष्ट्र इंडस्ट्री गव्हर्नमेंट नेटवर्किंग कार्यशाळा दि.8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता जालना येथील सॅफ्रॉन हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
उद्योग संचालनालयाच्यावतीने सर्वसमावेश परिवर्तन आणि सक्षमीकरणासाठी इग्नाईट महाराष्ट्र इंडस्ट्री गव्हर्नमेंट नेटवर्किंग कार्यशाळा जिल्हा, राज्यभर जागरुकता व उद्योजकता जोपासण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमात उद्योगतज्ञ, सरकारी अधिकारी, निर्यातदार आणि स्टेक होर्ल्डर्संना भारतातून निर्यात वाढविण्यासाठी सध्याची आव्हाने, संधी आणि धोरणे या विषयावर विचारमंथन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, जालना कार्यालयाकडे संपर्क साधावा, असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे