pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

शिवतेज कामगार संघटनेने अमेया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कामगारांना मिळवून दिली भरघोस पगार वाढ व इतर भत्ते

शिवतेज कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या यशस्वी मध्यस्थी बद्दल कामगारांच्या तर्फे जाहीर सत्कार

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 19

उरण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख, कार्यसम्राट माजी आमदार व शिवतेज कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरशेठ भोईर व प्रमुख सल्लागार व तालुका संघटक बी एन डाकी यांच्या नेतृत्वाखाली तसेच सततचा पाठपुरावा योग्य मध्यस्थी व मार्गदर्शनामुळे अमेया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, खोपटे मधील पर्लफेल्ट सर्वेयर मधील सर्वे कामगारांना भरघोस पगारवर व विविध भत्ते मिळवून दिले आहेत यामध्ये अमेया कंपनीच्या सर्वेयरच्या ९ वर्षाच्या इतीहासात प्रथमच ७००० रु ची भरघोस पगार वाढ, प्रथमच पहील्या वर्षी ८०% , दुसऱ्या वर्षी १० % व तिसऱ्या वर्षी १०% पगारवाढ तसेच प्रथमच लीव ईन कॅश, ओटी डब्बल, इन्शुरन्स डेथ पॅालिसी व इतर सुविधा शिवतेज कामगार संघटनेच्या माध्यमातून मिळवून दिल्या व या सर्व सुविधा चालू झाल्या याबद्दल संस्थापक अध्यक्ष माजी आमदार मनोहरशेठ भोईर व सरचिटणीस महेंद्र सावंत यांचा सर्व कामगारांच्या तर्फे जाहीर सत्कार मंगळवार दिनाकं 19 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आला.

या वेळी शिवतेज कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष रविंद्र पाटील,अध्यक्ष सतिश म्हात्रे, उपाध्यक्ष प्रतिक म्हात्रे,सल्लागार मिथुन भगत, छगन ठाकुर, मंगेश डाकी, रोहीत भगत, अक्षय ठाकुर, राकेश म्हात्रे, कुलदीप भगत,महेंद्र म्हात्रे यांनी कामगारांच्या वतीने माजी आमदार मनोहर भोईर व सरचिटणीस महेंद्र सावंत यांचा सत्कार केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे