कृष्णा सवडे आणि भगवान चव्हाण यांचा प्राथमिक शिक्षक संघ जाहीर प्रवेश

जाफराबाद/विशाल देशमुख,दि 14
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जाफराबाद तालुकाध्यक्ष कृष्णा सवडे आणि समता शिक्षक संघटनेचे नेते भगवान चव्हाण यांनी शनिवारी तारीख 13 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात जाहीर प्रवेश केला.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव भालके यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि जाफराबाद तालुका अध्यक्ष विनोद पाटील कळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या प्रवेश सोहळ्यात दोन्ही शिक्षक नेत्यांची जाहीर स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष विनोद कळंबे म्हणाले की संपूर्ण राज्यात शेख नेते संभाजीराव थोरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्राथमिक शिक्षक संघाची घोड दौड सुरू असून संघाच्या विचाराने प्रभावित होऊन विविध शिक्षक संघटनाचे पदाधिकारी प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश करीत आहेत. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष भगवान भालके म्हणाले की प्राथमिक शिक्षक संघात प्रवेश घेणाऱ्या नेत्यांना योग्य ती जबाबदारी लवकरच देण्यात येईल. यावेळी त्यांचे स्वागत भगवानराव भालके, विनोद कळंबे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख वसंतराव शेवाळे, राज्य नेते रिजवान शेख, पतसंस्थेचे मानस सचिव संजय लोखंडे, सरचिटणीस सतीश राऊत, संपर्कप्रमुख अनंता जंजाळ, कार्याध्यक्ष सुनील पवार, गणेशराव लहाने,धनंजय आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती.


