pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्री दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे महानैव्यद्य आरती व महाप्रसादाने सांगता

४०,००० भाविक सेवेकऱ्यांनी घेतला आरती व महाप्रसादाचा लाभ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.27

बजाजनगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर अंतर्गत बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त सुरू असलेल्या अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाची सांगता दिनांक २७ डिसेंबर रोजी महानैव्यद्य आरती ने करण्यात आली. या वेळी तब्बल ४०,००० भाविक सेवेकऱ्यांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. दिवसभर श्री स्वामी समर्थ केंद्राच्या दिशेने भाविक सेवेकऱ्यांचा ओघ चालूच होता. बजाजनगर येथील सर्व रस्ते भाविक सेवेकऱ्यांच्या गर्दीने गजबजले होते. महानैव्यद्य आरतीनंतर परमपूज्य गुरूमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या राष्ट्रकल्याण व राष्ट्रसंरक्षण साठी ग्रामअभियान चळवळ याविषयी श्री. संतोष पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन केले. ग्रामअभियान अंतर्गत सेवा मार्गाच्या आठरा विभागाच्या कार्य पध्दतीची ओळख मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. सेवेकरी कसा असावा, त्याची दैनंदिनी काय असावी, परमपूज्य गुरुमाऊलींना अपेक्षित सेवेकरी याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यात्मातून राष्ट्र हित साधण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम सेवा मार्गाच्या माध्यमातून होत असतात. याची ओळख उपस्थित भाविक सेवेकऱ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली.
सप्ताह काळात झालेल्या सामुदायिक सेवेचा अहवाल सादर करून झालेली सर्व सेवा भाविक सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण केली. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या २०%अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन कार्यक्रम ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरासाठी मोठ्या संख्येने भाविक सेवेकरी सहभागी झाले होते.

3/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे