pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

“विकसित भारत संकल्प यात्रेच्या”माध्यमातून शासकीय योजनांचा गावागावात जागर

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.28

केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने “विकसित भारत संकल्प यात्रा”  सध्या जालना जिल्ह्यात सुरु आहे.  शासकीय योजना गावागावात नेणाऱ्या या  “विकसित भारत संकल्प यात्रे” ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
शुक्रवार, दि. 29 डिसेंबर रोजी पुढील गावात जाणार “विकसित भारत संकल्प यात्रा” – जालना तालुक्यातील ढगी व शंभू सावरगाव, अंबड तालुक्यातील बनगाव व रुई, घनसावंगी तालुक्यातील रांजणीवाडी व रांजणी, बदनापूर तालुक्यातील कस्तुरवाडी व देवगाव, परतूर तालुक्यातील रायगव्हाण व फुलवाडी, भोकरदन तालुक्यातील भिवपूर व वडी बु., येथे जाईल. या यात्रेसमवेत पंचायत समिती अंतर्गत अधिकारी-कर्मचारी असतील. विकसित भारत संकल्प  यात्रेच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. यात शिक्षणापासून ते आरोग्यापर्यत, स्वयंरोजगारापासून कृषीपर्यंत विविध योजनांचा समावेश आहे. या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान विविध योजनांचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे