pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

ग्रामस्थांच्या मागणीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष शाळेला ईमारत दिली प्रतिनियुक्तीवरील शिक्षक द्या आमदार जवळगावकर यांच्याकडे वाचला अडचणीचा पाडा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.24

हदगाव वांरगा रोडवर पाच हजारांहून अधिक लोकसंख्येसह विविध कार्यालये असलेल्या बरडशेवाळा ता.हदगांव येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शाळा आहे. ईमारत जुन्या पद्धतीचे बांधकाम केलेली असल्याने त्या पाडुन ग्रामपंचायत व गावक-यानी आमदार जवळगावकर यांच्या माध्यमातून नुकतेच तिन वर्ग खोल्याचे बांधकाम केले .
शाळेला मुख्याध्यापकासह सहा वर्ग शिक्षक आहेत. गेल्या सात महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना पदाचा दुरुपयोग करुन दोन शिक्षकांचा सोयीनुसार प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे.तर सध्या एक शिक्षक निवडणूक विभागाचे काम करत आहे.तर दोन शिक्षक मराठा समाज सर्वेक्षणात आहेत. तर एक शिक्षक रजेवर आहे.सध्या दोन शिक्षकावर सात वर्ग असल्याने बरडशेवाळा येथील विद्यार्थ्यासह पालकाकडुन रोष व्यक्त होत आहे.
प्रतिनियुक्तीवर पाठवलेले दोन शिक्षक तात्काळ द्या या अशी मागणी शालेय शिक्षण समिती सदस्य प्रभाकर दहिभाते यांनी मुख्य कार्य अधिकारी, शिक्षणाधिकारी नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे यापुर्वीच केली होती.पंरतु याकडे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने शिक्षक व प्रशासन वजनात भारी पडले असल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे.
आमदार जवळगावकर बरडशेवाळा येथे डॉ.शिवाजीराव पोले यांच्या घरी सांत्वन भेटीत आले असता ग्रामस्थांनी बरडशेवाळा येथील शाळेला तिन वर्ग खोल्या दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करीत रिक्त पदासह पदनियुक्ती विषयासह शाळेतील अडी अडचणीचा पाडा वाचला.यावेळी शिक्षण समिती सदस्य प्रभाकर दहिभाते यांनी आपण जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली. यावेळी गावक-यानी आम्हाला शिक्षक द्या अन्यथा आम्ही शाळेला कुलुप लावणार असल्याचे सांगीतले.आमदार जवळगावकर यांनी याविषयावर संबधित विभागासह शिक्षणाधिकारी सवीता बिरगे यांना बरडशेवाळा येथील शिक्षकाच्या प्रश्नासह शाळेतील विविध विषय मार्गी लावण्याच्या दुरध्वनी संदेशाने सुचना केली आहे.या गंभीर याविषयावर संबधित विभागाकडून कधी दखल होईल याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे