pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

कला क्रीडा दूत फाऊंडेशनच्या गौरव पुरस्कारांची घोषणा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]
जालना/प्रतिनीधी,दि.24
कला क्रीडा दूत फाऊंडेशन महाराष्ट्र, स्वप्नपुर्ती सांस्कृतीक व क्रीडा मंडळ जालना व महा लोकाधिकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमीत्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या व्यक्तींना गेल्या सात वर्षापासुन महाराष्ट्र कला व क्रीडा रत्न, मराठवाडा रत्न, मराठवाडा भुषण, जालना रत्न व जालना भुषण गौरव पुरस्कार देण्यात येतो, याही वर्षी सदर पुरस्कारांची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख चाँद पी.जे. यांनी आज दुपारी संस्थेच्या संपर्क कार्यालयात केली.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये
महाराष्ट्र कला रत्न – सय्यद कासीम कालीब (शायरी/गजल) जालना, श्रीमती अर्चना सांगरोळकर-वासडीकर (नृत्य/गितगायन) जालना महाराष्ट्र क्रीडा रत्न – काजी सय्यद माऊदोद्दीन अर्शद, ता. अंबड जि. जालना, मेघशाम बळीराम शिंदे, ता. भुसावळ जि. जळगांव, किशोर बाबुराव नावकर ता.जि. छ. संभाजी नगर. मराठवाडा भुषण – शब्बीर खा ईब्राहीम खा कुरेशी (शैक्षणीक क्षेत्र) ता. भोकरदन, जि. जालना. मराठवाडा रत्न – सय्यद हुसेन सय्यद मकबुल (प्रशासकीय क्षेत्र) ता.जि. जालना, संजय भिकाजी नागरे (उद्योग-व्यापार क्षेत्र) ता.जि. जालना, अहेमद जलीस अशफाक अहेमद (सामाजीक क्षेत्र) ता.जि. छ. संभाजीनगर, जालना भुषण – श्रीमती आयेशा खान यासीन मुलानी (सामाजीक क्षेत्र) ता.जि. जालना, विशाल सुभाष अस्वार (पत्रकारीता क्षेत्र) ता.भोकरदन जि. जालना, जालना रत्न – देवानंद अशोकराव चित्राल (प्रशासकीय क्षेत्र) ता. अंबड जि. जालना, शेख रफीक छोटुमीया (शैक्षणीक क्षेत्र – उर्दु विभाग) ता. बदनापुर जि. जालना, साजेद मुबारक रंगरेज (शैक्षणीक क्षेत्र – उर्दु विभाग) ता. जि. जालना, मो. अशफाक अहेमद (शैक्षणीक क्षेत्र – उर्दु विभाग) ता.जि. जालना, साबेरोद्दीन नुरोद्दीन शेख (शैक्षणीक क्षेत्र – उर्दु विभाग) ता. जाफ्राबाद जि. जालना, शेख मुकसीत अहेमद (शैक्षणीक क्षेत्र – उर्दु विभाग) ता. परतुर जि. जालना, जालना कला रत्न – सागर देवीदास बुरसे ता.जि. जालना  जालना क्रीडा रत्न – कृष्णा देवीदास जंजाळ, ता. भोकरदन जि. जालना, यशवंत विश्‍वनाथ जंजाळ ता. बदनापुर जि. जालना, प्रल्हाद बाबुराव काळे, ता. जाफ्राबाद जि. जालना  आदिंचा समावेश आहे.
पुरस्कार प्राप्त व्यक्तींना सदर पुरस्कार दिनांक 27 जानेवारी 2024 शनिवार रोजी संध्याकाळी 6 वाजता आयेशा लॉन्स, पाठक मंगल कार्यालयाच्या पाठीमागे, कचेरी रोड, जुना जालना येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हयातील नागरीकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटेनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे