pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त 25 जानेवारी रोजी श्री. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 24

25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली  गुरुवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता  जालना येथील श्री. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान जालना जिल्हा दिव्यांग स्वीप आयकॉन निकेश मदार हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र सन्मानचिन्ह वाटप केले जाणार आहेत. याशिवाय मतदार नोंदणीच्या अनुषंगाने उत्कृष्ट कार्य  करणारे अधिकारी, कर्मचारी व संस्थांना पुरस्कार दिले जाणार आहेत.  मतदारांसाठी प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन यावेळी केले जाणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे