pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उंचाडा ते तालंग एसटी सेवा सुरू करावी- सामाजिक कार्यकर्ते सुरज पाटील चव्हाण

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.4

उंचाडा ते तालंग एसटी सेवा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त सुरज पाटील चव्हाण यांच्या सह गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे, याबाबतचे निवेदन सूरज पाटील चव्हाण यांनी हदगाव एसटी आगारात दिले, उंचाडा हे एक प्राचीन गाव असून येथे कालिंका देवीचे मंदिर आहे त्या मुळे आनेक भाविक भक्त व पर्यटक येथे भेट देतात, पण गावात येण्यासाठी एस टी ची सुविधा नसल्याने या ठिकाणी येणारे पर्यटक व भक्त मंडळींची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते . उंचाडा गावात जिल्हा परिषदेची इयत्ता 7 वि पर्यंतचीच शाळा आहे, पुढील शिक्षना साठी विद्यार्थी आ बाळापूर, हदगाव किंवा नांदेड येथे प्रवेश घेतात. पण आर्थिक परिस्थीती कमकुवत आसनाऱ्या शेतमजुरांची , दलितांची, आदिवासींची मुले शेजारच्या गावात आसणाऱ्या, व गावा पासून 4 ते 5 किमी अंतरावर असलेल्या शाळेत शिक्षण घेतात, या विद्यार्थिनींना दररोज 8 ते 10 किमी पायपीट करत शिक्षण घ्यावं लागतं आहे हे दुर्भग्यच , दहावी चे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष आसते , बोर्डाचे पेपर आसल्याने विद्यार्थांच्या आभ्यासाचा कस लागलेला आसातो पण उंचाडा गावात राहणाऱ्या इयत्ता 10 वी च्या विद्यार्थिनींचा आमुल्य वेळ मात्र 8 ते 10 किमी च्या पायी प्रवासात खर्च होतो , शिवाय पायी चालल्याने शरीर पूर्ण थकून जाते , त्यामूळे विद्यार्थिनीं च्या आभ्यासावर देखील विपरीत परिणाम होत आहे . या बाबी विचारात घेता लवकरात लवकर एस टी ची सेवा उंचाडा गावात सुरू करण्यात यावी.

एकी कडे शासन मुलींच्या शिक्षणा साठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे , ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी शासनाने आहील्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना मोफत एस टी प्रवासाची सुविधा दिली आहे पण उंचाडा गावातल्या विद्यार्थीनींना मात्र शिक्षणा साठी दररोज 8 ते 10 किमी पायपीट करत शिक्षण घ्यावं लागतं आहे. कॉलेज च्या शिक्षणासाठी हदगाव किंवा आ बाळापूर शिवाय पर्याय नसल्याने व प्रवासासाठी एस टी ची सुविधा नसल्याने आनेक विद्यार्थीनींना शिक्षण घेण्याची इच्छा आसतांना देखील शिक्षण आर्ध्यावर सोडून द्यावं लागतं आहे. शासन आपंग व्यक्तींना एस टी प्रवासात 75 टक्के सूट देते पण गावात एस टी नसल्याने आपंग व्यक्तींना मोठा त्रास होत आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना महाराष्ट्र शासना कडून मोफत एस टी सुविधा दिली जाते या सुविधेचा लाभ रुग्णालयात जाण्यासाठी , निराधार योजनेचे पैसे उचलण्यासाठी ज्येष्ठांन कडून केला जातो पण गावात एस टी नसल्याने ज्येष्ठांना मोठ्या आर्थिक जाचाला सामोरे जावे लागत आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र , उपकेंद्र नसल्याने रुग्णांना खासगी गाडी करून रुग्णालयात जावे लागत आहे. दवाखान्या पेक्षा प्रवासाचा खर्च जास्त होत आहे , गंभीर आजार आसलेल्या रुग्णांना शासन मोफत प्रवास सेवा देत आसते पण गावातली रुग्णांना मात्र मोफत प्रवासाचा लाभ घेता येत नाही. गावातली शेकडो विद्यार्थी शाळा महाविद्यालयात जात असतात. पण एसटी सेवा बंद असल्याने विद्यार्थी , रुग्ण व पर्यटकांचे प्रचंड हाल होत आसल्याने दिसून येत आहे. तरी उंचाडा ते तालंग एस टी सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सूरज चव्हाण सह गावकऱ्यांकडून केली जात आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे