तोष्णीवाल महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणाची सोय
हिंगोली/प्रतिनिधी, दि.8
दिनांक 9 ऑगस्ट 2024 श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ येलदरी कॅम्प संचलित तोष्णीवाल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सेनगाव येथे शैक्षणिक वर्ष 2024 -25 पासून एम एससी भौतिकशास्त्र, एम एससी सूक्ष्मजीवशास्त्र , एम एस सी रसायनशास्त्र एम एसी , मत्सशास्त्र व एम ए इंग्रजी आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची मान्यता प्राप्त झाली झाली असून उपरोक्त अभ्यासक्रम यावर्षीपासून चालू होणार आहे. मागील काही वर्षापासून एम ए मराठी , एम ए अर्थशास्त्र ,एम एससी वनस्पतीशास्त्र एम कॉम (बँकिंग आणि इन्शुरन्स) इत्यादी पदव्युत्तर अभ्यासक्रम व्यवस्थितपणे चालविले जात आहेत. प्रवेशित विद्यार्थी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती व इतर लाभासाठी पात्र असतील. प्राचार्य डॉ एस .जी. तळणीकर यांनी पात्र विद्यार्थ्यांना उपरोक्त पदव्युत्तर अभ्यासक्रमात आपला प्रवेश निश्चित करावा असे आव्हान केले .सेनगाव सारख्या ग्रामीण परिसरात नऊ पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात ही बाब निश्चितच कौतुकास पात्र आहे.


