pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

आदर्श इंग्लिश स्कूल जामखेड मध्ये दीपावली स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

दीपावली सुट्टीचा आनंद पण शाळेशी काही दिवस दुराव्या मुळे विद्यार्थी झाले भावनिक

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

अनिल भालेकर/अंबड,दि.25

दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सण म्हणून अद्वितीय जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर बंधूभावा,,स्नेह,सहकार्याचे मांगल्याचे प्रतीक दिवाळी आहे.
दीपावली उत्सवानिमित्त जामखेड सह संपूर्ण पंचक्रोशीत शैक्षणिक क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या आदर्श इंग्लिश स्कूलच्या वतीने दीपावली स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
संमेलनाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष डॉ.गंगाधर पांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सचिव श्रीमती आशा पांढरे, प्राचार्य आर.आर वैद्य, मुख्याध्यापिका वैशाली खिलाडे, प्रा. तुळशीराम पांढरे विराजमान होते.
संमेलन निमित्त सर्व विद्यार्थ्यांनी रंगीत ड्रेस परिधान करून आल्यामुळे शाळेचा संपूर्ण परिसर अत्यंत आकर्षक दिसत होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेले उत्कृष्ट आकाश कंदील व सजावट साहित्याने कार्यक्रम स्थळाची अत्यंत शोभा वाढवली. संमेलन स्थळी आकर्षक सजावट व दीप प्रज्वलित करण्यात आल्यामुळे वातावरणात प्रसन्नता व नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यातच सुमधुर संगीताने कार्यक्रमात गोडवा निर्माण झाला होता.
संमेलन प्रसंगी डॉ.गंगाधर पांढरे यांनी विद्यार्थ्यांना दीपावली सण सर्वधर्मसमभाव,सहकार्य,स्नेह उन्तिगत होण्याचा, आयुष्यातील अंधकार दूर होण्याचा सण असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना दीपावलीच्या सदिच्छा दिल्या. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना याप्रसंगी मिठाईवाटप करण्यात आली.
एकीकडे दीपावली सणाचा आनंद सुट्टीचा आनंद तर दुसरीकडे सुट्टीच्या काळात काही दिवस आवडती शाळेपासून दुरावा मित्र मैत्रिणींशी काही दिवस भेट होणार नसल्यामुळे विद्यार्थी भावनिक झाले होते.
संमेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी भोजने यांनी केले तर आभार प्रदर्शन अहिल्या भोजने यांनी केले. अत्यंत प्रसन्न व आनंददायी वातावरणात संपन्न झालेले हे दीपावली संमेलन प्रसंगी शाळा महाविद्यालयातील सर्व कर्मचारीवृंद,पालक विद्यार्थी उपस्थित होते

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे