pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात 72.67 टक्के मतदान

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 21

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर आणि 103-भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 755 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत मतदान पार पडली असून, जालना जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातून एकुण 72.67 टक्के मतदान झाले आहे.

काल (दि.20) रोजी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघात झालेले मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये 99-परतूर 70.12 टक्के, 100-घनसावंगी 77.16 टक्के, 101-जालना 64.39 टक्के, 102-बदनापूर 74.72 टक्के आणि 103-भोकरदन 77.36 टक्के असे एकूण 72.67 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

निवडणूकीच्या राष्ट्रीय कार्यात अमूल्य योगदान दिलेल्या सर्व मतदारांचे, सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सर्व शासकीय-निमशासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभाग, शिक्षक आणि प्रसार माध्यम प्रतिनिधी यांनी 5 विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी आपले योगदान देवून  सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे