pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर

2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 5.6 टक्‌यांनी मतदानात वाढ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 21

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नाव्हेंबर, 2024 रोजी मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या तुलनेत काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जालना जिल्ह्यात 5.6 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली असून, विधानसभा मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मध्ये 67.07 टक्के मतदान झाले होते. तर काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 72.67 टक्के मतदान झाले आहे. यानुसार 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये  5.6 टक्क्यांनी मतदान वाढ झाली आहे. जालना जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघात 70 टक्के तर 2 विधानसभा मतदारसंघात 75 टक्‌याहून अधिक मतदान झाले आहे.

काल पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या मतदानाच्या टक्केवारीत राज्यातील पश्चिमेकडील कोल्हापूर जिल्हा प्रथम तर पूर्वेकडील गडचिरोली जिल्हा दूसऱ्या क्रमांकावर तर राज्यातील मध्य भागातील जालना जिल्हा हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे