pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघात महिलांच्या मतदानात वाढ

महिला मतदार ठरवणार जालना जिल्ह्यातील उमेदवाराचे भविष्य 

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 21

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नाव्हेंबर, 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्या तुलनेत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये 6.27  टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 मध्ये 65.24 टक्के महिलांनी मतदान केले होते तर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 71.51 टक्के महिला मतदारांनी मतदान केले आहे.  यामुळे जिल्ह्यातील महिला मतदार या जालना जिल्ह्यातील उमेदवार ठरवणार असल्याचे चित्र आहे. यानुसार 2019 च्या तुलनेत 2024 मध्ये 5.6 टक्‌यांनी महिला मतदारांच्या मतदानात वाढ झाली आहे.

जालना जिल्ह्यातील मागील वर्षी स्त्री-पुरुष प्रमाण हे 1 हजार पुरुषामागे 901 स्त्रिया एवढे होते. परंतू जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या प्रयत्नातून विविध उपक्रम व जनजागृती करुन 1 हजार पुरुषामगे 921 स्त्रिया म्हणजे मागील 1 वर्षात 1 हजार पुरुषांमागे 20 स्त्रियांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मतदार यादीत महिला मतदारांचे गुणोत्तर 1 वर्षात 1 हजार पुरुषामागे 20 महिला मतदारांची वाढ झाली आहे. आणि याच महिला आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत जालना जिल्ह्यातील उमेदवारांचे भविष्य ठरविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे