pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी मतमोजणीच्या तयारीला लागण्याच्या दिल्या सूचना

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.21

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवार, दि. 20 नाव्हेंबर, 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी पार पडणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणीची प्रक्रियेच्या तयारीला लागण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केंद्रांचे ठिकाण पुढीलप्रमाणे आहेत. 99-परतूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी जवाहर नवोदय विद्यालय, अंबा ता. परतुर येथे होणार आहे. तर 100-घनसावंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था घनसावंगी, 101-जालना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना, 102-बदनापूर कृषि महाविद्यालय बदनापूर आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघाची नगर परिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे मतमोजणी होणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे