pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्री रामदूत बजरंगबली मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ५२५ महिलांचा मुळपत्रिका देऊन सन्मान

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

विरेगाव / गणेश शिंदे, दि. 11

मंठा तालुक्यातील वाई येथे सोमवारी श्री रामदूत बजरंगबली प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रम विविध पुजा करुन उत्सहात झाला. रविवारी दुपारी ३ ते ७ गावातुन कळस, ज्ञानेश्वरी गाथा, तुकाराम गाथा, रामायण गाथाची गावतुन विठ्ठल नामाच्या गजरात टाळ विना मृदंगा च्या भक्तीमय वातावरनात मिरवनुक काढण्यात आली होती.
सद्गुरु भगवान महाराज आनंदगडकर यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामायण कथा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात चक्री भजन, विष्णुसहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, राम कथा, हरिपाठ, किर्तन राम कथा प्रवक्ते जय महाराज सरनाईक, डॉ. अरुण महाराज वाळके पैठण, उद्धव महाराज राऊत आकणीकर, विश्वंभर महाराज माळोदे आष्टी, नारायण महाराज पिपळे गुरजी, नंदू महाराज जाधव खडका, सागर महाराज दिंडे यांचे किर्तन झाले. सोमवारी सकाळी ९ वाजता श्री रामदूत बजरंगबली प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मठाधिपती गुरुवर्य परमश्रद्धेय श्री महंत भगवत गिरीजी महाराज व श्री महंत बालक गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते विविध धार्मिक पुजा होम करुण करण्यात आले. नंतर १० ते १२ काल्याचे किर्तन अर्जुन महाराज मोटे पळशीकर यांचे काल्याचे किर्तनाने सांगता झाली नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

लोकसहभागातून उभारले मंदीर
श्री रामदूत बजरंगबली च्या मंदीराचे काम लोक सहभागातुन उभारण्यात आले.भव्य अस मंदिर उभारणीसाठी १३ लाख रुपये खर्च करुन बजरंगबलीचे मंदीर ऊभारण्यात आले. मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कळस रोहन सोहळ्यासाठी सासरी आसलेल्या मुलींना सोहळ्यासाठी ५२५ महिलाना मुळपत्रिका देण्यात आल्या होत्या असे शिवाजी महाराज वाई यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे