pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मोर्शीत सावकारांच्या घरावर धाड; सहकारी संस्थेच्या उपनिबंधकाकडे तक्रार येताच कारवाई,

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी /त्रिफुल ढेवले,दि 11

मोर्शी : मोर्शी शहरातील अप्पर वर्धा कॉलनी वसाहतीत दोन महिला गेल्या काही दिवसांपासून सावकारी व्यवसाय करत असल्याची तक्रार सहकारी संस्थेच्या उपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली होती. त्याद्वारे निबंधक सहकारी संस्थेच्या सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे यांच्या पथकाने अपर वर्धा वसाहतीत राहणाऱ्या अर्चना झटाले यांच्या घरी धाड टाकली. हेदपोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या तिवसा येथील सहाय्यक निबंधक प्रीती धामणे यांच्या पथकाने पूजा राजपूत रा. अप्पर वर्धा कॉलनी, मोर्शी या दोन महिलेच्या घरी 10 जानेवारीला धाड टाकली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून हमीपत्र, 2 लाख 50 हजार रूपये उसनवारी दिल्याबाबतचा नोंद असलेला कागद, व्याजाने पैसे दिले असल्याबाबतची नोंदवही, दुसऱ्या व्यक्तीचे स्वाक्षरी असलेले कोरे धनादेश व कोरा स्टॅम्प पेपर व दस्तऐवज जप्त करण्यात आले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मोर्शी कार्यालयाचे अधिकारी फिर्यादी राजेश भुयार यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोन्हीही सावकार महिलांना 27 जानेवारीपर्यंत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. गैर अर्जदार दोन्ही महिलेने 31 जानेवारी रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात सादर केला. त्यामध्ये दोन्ही महिलांनी अवैध सावकारी केल्याचे दिसून आले. त्यामुळे 5 फेब्रुवारी रोजी मोर्शी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला. त्यानुसार, पोलिसांनी सावकार महिला अर्चना झटाले व पूजा राजपूत यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 23,39, अन्वे गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास मोर्शी पोलिस करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे