pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.29

 उच्च न्यायालय मुंबई व मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व एम.आर.डी.ए. स्कुल, जालना यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी एम.आर.डी.ए. स्कुल, जालना येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.

त्याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, जालना तथा प्रमुख न्यादंडाधिकारी जुवेनाईल जस्टीस बोर्ड (जे.जे.बी.), आर.एन. मुजावर, सदस्य बाल न्यायमंडळ, जालना अॅड. अश्विनी एम. धन्नावत, व एम.आर.डी. स्कुलच्या संचालीका ईश्वरी चव्हाण उपस्थित होत्या. त्यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांनी पोक्सो अॅक्ट विषयी मुलांना मार्गदर्शन केले. सचिव प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालयाची माहिती व या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. आर.एन. मुजावर यांनी जुवेनाईल अॅक्ट प्रमाणे बालकांचे हक्क, या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच अॅड. अश्विनी एम. धन्नावत यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ, बाल विवाह या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे