pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.29 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला / मुलींना इयत्ता 1 ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्रय रेषा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही 1 लाख एवढी असुन यासाठी सक्षम अधिका-याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी संमती पत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असुन दिनांक 23 मे, 2025 पर्यंत परिपुर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

तरी या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यावर होणारा संपुर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायंन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे