pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

बाल वारकरी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ. सभाजीनगर /आनिल वाढोणकर,दि.3

बजाज नगरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगणात सद्गुरू हभप मारोती बाबा कु-हेकर आणि सद्गुरू हभप नामदेव महाराज चारठाणकर यांच्या आशीर्वादाने दि.2 मेपासून आयोजित वारकरी बाल संस्कार शिबिराचे उद्घाटन सकाळी ध्वजपूजन करुन करण्यात आले. यावेळी सरपंच सुनील काळे ,उपसरपंच श्रीकांत साळे, उद्योजक हनुमानराव भोंडवे, कैलास भोकरे, विठ्ठल मंदिर विश्वस्थ अध्यक्ष दामोदर घुगे, सचिव तानाजी सरडे, सचिन गरड , ह.भ.प. आप्पासाहेब महाराज गायके, ह.भ.प. बबन महाराज चौरे, ह.भ.प. संतोष महाराज पांडे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कोरडे, ह.भ.प. कैलास महाराज बारगळ, ह भ प बालगीरी महाराज, किशोर महाराज भावडेकर, ज्ञानेश्वर महाराज कांबळे, गणेश महाराज कोलते ,भीमराव महाराज भवर , अर्जुन उबाळे, संजय देशपांडे, आदिनाथ सोलट, बळीराम इंगळे, सुभाष अवताडे, ईश्वर जाधव, मदन कारले, एम.डी.
पवार यांची उपस्थिती होती .
शिबिरात पाक्षिक सराव, प्रार्थना, हरिपाठ, अभंग पठण, गीता व विष्णु सहस्रनाम संहिता, दुपारी गायन पाठ व संत चरित्र, सायंकाळी हरिपाठ व पावली मार्गदर्शन होईल. प्रवचन परंपरेतील सांप्रदायिक
वाद्यांसह कीर्तन या विषयावर हभप आप्पासाहेब महाराज गायके मार्गदर्शन करतील . शिबिरात सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी वारकरी प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रशिक्षणासाठी वारकरी संप्रदायाचे हभप आप्पासाहेब महाराज गायके, ज्ञानेश्वर महाराज कोरडे, कैलास महाराज बारगळ हे शिकवणार आहेत. शिबिराचा समारोप २१ मे रोजी सद्गुरू हभप नामदेव महाराज चारठाणकर यांच्या कीर्तनाने होईल. कीर्तनानंतर दत्तात्रेय ठुबे पाटोदकर यांच्यावतीने महा
प्रसाद होणार आहे परिसरातील भाविकांनी या शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन युवा आयोजक ह.भ.प. आप्पासाहेब महाराज गायके यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे