pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

पत्रकार पदविका कोर्स पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.5

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार पदविका कोर्सच्या पदवीदान समारंभाचा भव्य सोहळा नाशिकमधील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विशाल हॉलमध्ये उत्साहात पार पडला.

या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज १८ लोकमत मुंबईचे संपादक मा. श्री. मंदार फणसे, वकीलनामा यूट्यूब चॅनलचे संस्थापक व सायबर कायदे तज्ज्ञ मा. अ‍ॅड. अद्वैत चव्हाण, तसेच कोर्सच्या संचालिका सौ. कृतिका संदीप मराठे उपस्थित होते.

समारंभात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पत्रकारितेतील नवे मार्गदर्शन दिले व त्यांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. यावेळी पत्रकारितेच्या क्षेत्रातील नव्या संधी, समाजातील माध्यमांची भूमिका, आणि जबाबदाऱ्यांचे महत्व यावर सखोल मार्गदर्शन केले.

संचालिका सौ. कृत्तिका मराठे यांनी त्यांच्या भाषणात पत्रकार पदविका कोर्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापुरता मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात लागणारे व्यावहारिक कौशल्य, प्रसारमाध्यमांचे कार्यपद्धतीचे अनुभव आणि तांत्रिक ज्ञान प्रदान करणे हा आहे. यावेळी एप्रिल बॅच च्या 50 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आले.
विद्यार्थ्यांना विविध माध्यम प्रकारांमध्ये (प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल) काम करण्याची तयारी करून देणे, त्यांना जबाबदार पत्रकार बनवणे, तसेच समाजातील घडामोडींबाबत संवेदनशील दृष्टिकोन निर्माण करणे हे या कोर्समागील मुख्य उद्दिष्ट आहे असे सागितले, तसेच लवकरच हिंदीमध्ये हा कोर्स चालू करण्याचे ही घोषणा त्यांनी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. संचालिका

नवोदित पत्रकार बंधू-भगिनींना अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत समारंभाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे