जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठकित दिव्यांग पालकमंत्री यांना घेरावा
पोलिस प्रशासनाने मध्यस्थीने पालकमंत्री, खासदार यांची शिष्टमंडळासोबत चर्चा निवेदनावर पालकमंत्र्यांनी खासदार, आमदार निधी पुर्ण करण्याचे दिले आश्वासन
नांदेड/चंपतराव डाकोरे पाटिल,दि.20
नांदेड जिल्हा नियोजन भवन येथे खासदार, आमदार प्रशासकिय अधिकारी यांची पालकमंत्री सावे साहेबासोबत बैठक चालु असताना बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समिती नांदेड व दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त पुणे नांदेड जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार यांच्या निवासस्थानी त्यांचे लक्ष वेधण्यासाठी दि.१५ जुनं २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत खासदार,आमदार दिव्यांगासाठी त्यांच्या मतदार संघातील दिव्यांगाना राखिव असलेला तिस लाख रू.दरवर्षी देण्याचा कायदा असुन ते देत नाहि लक्षवेधीत दिव्यांगाचे प्रश्न मांडत नसल्यामुळेमाजी.मुख्यमंत्री
राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी दि.१५ जुनं २०२५ ला निवासस्थानी भिक मांगो ,आकोश आंदोलनास सुरूवात करून ते आज दि.२० जुनं २०२५ रोजी पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शेकडो दिव्यांग नियोजन भवनावर धडकले असता पोलिस प्रशासन
दिव्यांग शिष्टमंडळाचे मां.राहुल साळवे, चंपतराव डाकोरे पाटिल कुंचोलीकर यांच्या शिष्टमंडळ
पालकमंत्री नांदेड तथा दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबईचे अध्यक्ष मा.अतुल सावे साहेब
यांच्या सोबत चर्चा करून निवेदन स्विकारून पुर्ण निधी खर्च करण्याचे खालील मागण्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले दिव्यांग व्यक्ती साठीचे अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१८ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात यावे.
खासदार,आमदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गतचा दिव्यांगांच्या दरवर्षीच्या राखीव निधीतून स्वयंरोजगार पुरक साहित्य ज्यामध्ये, झेरॉक्स मशीन, कंप्युटर, पिठाची गिरणी, मोबाईल शाॅपसह दिव्यांग कर्मचारी यांच्या धर्तीवर बेरोजगार दिव्यांगांना तीनचाकी स्कुटी, कंप्युटर, लॅफटाॅप सारखे उपकरणे दरवर्षी वितरीत करण्यात यावे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना समीतीसह ईतर विविध समित्यांमध्ये दिव्यांगांना शासन निर्णयानुसार अशासकीय सदस्यत्व देण्यात यावे.
जिल्हा परिषद नांदेड येथील बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे
दिव्यांगांचा शासकीय अनुशेष तत्काळ भरून काढण्यात यावे
या आंदोलनाचे नेतृत्व राहुल साळवे,चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर, कार्तिक भक्तीपुरम, सुनील जाधव,शिवाजी सुर्यवंशी,कावळे मुंजाजी, मोहसिन कादरी, गणेश नवघडे, भगवान नरवाडे,शेख जहरोध्दीन,सय्यद साजिद, निलेश गोवेकर, फैसल,आतिक हुसेन,अजय गोरे,कदम,सुरेश रामलुवार,प्रेम वैद्य,शेख यतिन शेकडो दिव्यांचा ऊपस्थित होते.
असे प्रसिध्दी पत्रक दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आले


