pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जागतिक योग दिनानिमित्त भाजपा जालना महानगर आणि योग भूमी परिवारातर्फे सामूहिक योगाभ्यास

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/ प्रतिनिधी,दि.21

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आज दिनांक २१ जून २०२५ रोजी भारतीय जनता पार्टी जालना महानगर व योग भूमी परिवार जालना यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य योग शिबीराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत ज्वाला लॉन्स, गुरुबच्चन चौक, महेश भवन समोर, जालना येथे उत्साहात संपन्न झाला.

यावेळी योग भूमी परिवाराचे योग शिक्षक श्री.डागा सर व त्यांचे सर्व प्रमुख पदाधिकारी, स्वयंसेवक सह भाजपाचे राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, बाबुराव भवर, सखुबाई पणबिसरे, ममता कोंड्याल, अमोल धानुरे सतीश केळकर, गोवर्धन कोल्हे, सिद्धिविनायक मुळे, डोंगरसिंग साबळे, सिद्धेश्वर हाजबे, सतीश अकोलकर, सुदर्शन काळे, सचिन मोहता, रणजीत रीडला, गोविंद ढेंबरे, निलेश गवळी, शाम उगले, तुकाराम बखळे, संजय माधवले, इत्यादीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी जालना महानगरचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली व योग शिक्षक श्री. डागा सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमात विविध वयोगटातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रशिक्षित योग शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणा करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि पुढाकाराने २०१५ पासून २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. भारताच्या प्राचीन योग परंपरेचा जागतिक स्तरावर प्रचार व प्रसार व्हावा यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात मांडलेला प्रस्ताव ऐतिहासिक ठरला होता. या उपक्रमाची प्रेरणा घेऊन जालन्यातील नागरिकांनीही या दिवशी योगाभ्यास करून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश दिला.

सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगभूमी परिवाराचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक तसेच भाजपाचे देविदास देशमुख, सुनील पवार यांनी परिश्रम घेतले.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे