pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयात योग दिन साजरा

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 22

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमती प्राजक्ता निकित पवार ह्या उपस्थित होत्या. त्यांनी आहार व योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले व विविध प्राणायामाचे प्रात्यक्षिक घेतले. तसेच विविध आसनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम.जी. लोणे यांनी भारतीय ज्ञानपरंपरा या विषयी माहिती सांगून प्राचीन षडदर्शनातील एक असलेल्या योगदर्शनाचे महत्त्व सांगितले. व विद्यार्थ्यांनी नियमित योगासने केली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. व्ही.एस. इंदुलकर, डॉ. एच. के. जगताप, प्रा. आर. टी. ठावरे, डॉ. पी. आर. कारुळकर, प्रा. रियाज पठाण, प्रा. पूजा गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.दत्ता हिंगमिरे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण यांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे