जवाहरलाल नेहरू पोर्ट अंतर्गत दिव्यांगांकरिता योग शिबिराचे आयोजन.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि 22
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यामधील जवाहरलाल नेहरू पोर्ट अंतर्गत उरण तालुक्यामधील दिव्यांग बांधवांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत योग सप्ताह अंतर्गत शिबिर राबवण्यात आले.
दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन. सदर योग दिन साजरा करण्यामागील जेएनपीटी पोर्ट च्या वरिष्ठ प्रबंधक मनीषा जाधव मॅडम यांनी यावर्षी एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत हा दिन दिव्यांगांकरिता साजरा करण्याचे ठरवले. तन आणि मन जेव्हा योगाने सजते तेव्हा आयुष्य खरच आरोग्याने भरते. याच प्रमाणे दिव्यांग बांधवांकरीता
योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ पोहोचवणे.निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे. दिव्यांगांनाही तणाव, चिंता आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी योगाचे महत्त्व समजावणे.योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. आणि या देणगीचा उपयोग दिव्यांगाना व्हावा असा त्यांचा मानस होता.योग ही केवळ व्यायामाची पद्धत नाही, तर ती एक जीवनशैली आहे. योग दिन साजरा करून आपण केवळ आरोग्य सुधारत नाही, तर भारताची एक प्राचीन परंपरा जिवंत ठेवतो.
या योगा शिबिरामध्ये उरण तालुक्यातील तब्बल १०० हुन अधिक दिव्यांग भर पावसात उपस्थित राहिले. याप्रसंगी दिव्यांगांकरिता अल्पोहार आणि १०० टी-शर्ट ही देण्यात आल्या. या योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक दिव्यांगाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारण इथे या कार्यक्रमाला येणारा सामान्य नागरिक नसून दिव्यांग होता. आलेल्या योगा प्रशिक्षकाने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करीत खेळीमेळीच्या वातावरणात सदर प्रशिक्षण दिले. याप्रसंगी शिवयोग चॅरीटेबल चे योगा प्रशिक्षक संतोष बहिरा, संगीता पाटील, बेला आगलावे तसेच उरण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि जेएनपिटीचे ट्रस्टी भूषण पाटील, दिव्यांग सामाजिक संघटनेचे सर्व शिलेदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची सांगता संघटनेचे सल्लागार मदन पाटील यांनी केले.या योग शिबिराचा आलेल्या दिव्यांग बांधवांना नक्कीच फायदा होईल तसेच दिव्यांग बांधव भविष्यात त्याचा नक्कीच सराव करतील आणि त्यांचे शरीर सुदृढ बनवण्याचा प्रयत्न करतील असे दिव्यांगा प्रति आश्वासन त्यांनी दिले.कार्यक्रमाचे आयोजक जवाहरलाल नेहरू पोर्ट आणि वरिष्ठ प्रबंधक मनीषा जाधव मॅडम यांचे यांचे यावेळी आभार मानण्यात आले.


