pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच मधुकर पवार यांचा भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि 25

मौजे निरखेडा येथील माजी सरपंच आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. मधुकर छोटू पवार यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर आणि भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या संघटन कौशल्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला.

भाजपाचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी श्री. मधुकर पवार यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “भाजपाचे नेतृत्व विकासाभिमुख असून देशहित व लोकहितासाठी झटणारा पक्ष आहे. आपल्या भागाच्या प्रगतीसाठी भाजपात राहून कार्य करणे हीच खरी गरज आहे.

कार्यक्रमास तालुका अध्यक्ष संजय डोंगरे, एसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल सरकटे, सरचिटणीस सुनील पवार, युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा गायके, सुमित सुरडकर, गणेश खरात, नागेश अंभोरे, नारायण जाधव, गोरख गायकवाड, देविदास देशमुख, गोवर्धन कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे