pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

श्री गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 7802 भाविक सेवेकऱ्यांनी केले गुरुपूजन

विविध कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी घेतला सहभाग

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

छ.संभाजीनगर/आनिल वाढोणकर,दि.10

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ-त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष गुरूमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाने बजाजनगर येथील सेवा केंद्रात श्री गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने श्री गुरू पुजन करून गुरूपद घेण्यासाठी पंचक्रोशी
तील सर्व भाविक सेवेकऱ्यांची दिवसभर रिघ पहाण्यास मिळाली. सर्व रस्त्यावर सेवेकऱ्यांची गर्दी दिसत होती.
पहाटे ५.०० वाजता सामुदायिक महाभिषेकानंतर उत्सवाला सुरवात झाली. सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन सेवा मार्गाला अपेक्षित अनेक सामाजिक उपक्रम बजाजनगर सेवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात आले. यामध्ये मोफत सर्व रोग निदान शिबीर व रक्तदान शिबीराचा समावेश होता.
मोफत सर्व रोग निदान शिबीरामध्ये परिसरातील १५ तज्ञ डॉक्टरांच्या टिमने विनामूल्य आपली सेवा रूजू करून समाजकार्यात सहभाग नोंदवला. तसेच छत्रपती संभाजी नगर येथील महाराष्ट्र ब्लड बँक यांनी रक्त संकलन चे कार्य केले. दिवसभरात हजारो सेवेकऱ्यांनी दर्शनाचा लाभ घेत ८७३२ सेवेकऱ्यांनी श्री गुरूपुजन करून गुरूपद घेतले. एकुण १०७ सेवेकऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला. तसेच ८५० पेक्षा जास्त भाविक सेवेकऱ्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला.
उत्सव यशस्वीपणे साजरा करण्यासाठी बजाजनगर सेवा केंद्रातील युवा प्रबोधन प्रतिनिधी व सर्व सेवेकऱ्यांनी प्रयत्न केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे