pub-7425537887339079
[t4b-ticker]
आरोग्य व शिक्षणसंपादकीय

 जागतिक लोकसंख्या दिन :  सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

    जागतिक लोकसंख्या दिन :  सुखी जीवनाचा उपाय लोकसंख्या वाढीवर मात

जागतिक लोकसंख्या दिन – 11  जुलै 2025            दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी प्रत्येक वर्षी संपुर्ण विश्वात साजरा करण्यांत येतो.  11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 1 अब्ज झाल्याचे संयुक्त राष्ट्रीय कौन्सिलींग यांच्या निदर्शनास आले.  तेंव्हापासुन 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यांत येतो. प्रथम जागतिक लोकसंख्या दिन हा 11 जुलै 1989 रोजी साजरा झाला.  सतत वाढणा-या लोकसंख्येचे दुष्यपरिणामांबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने 11 जुलै रोजी दरवर्षी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.  या वर्षीचे घोषवाक्य खालील प्रमाणे आहे.                                                                                                                                               ‘आई होण्यासाठी योग्य वय तेंव्हा                                                                                                            शरीर व मनाची तयारी जेंव्हा ’

            जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येक दाम्पत्याने कुंटूंब नियोजनाची जबाबदारी घेऊन यशस्वी पार पाडावी.  लोकसंख्यावाढी मुळे विविध समस्याला तोंड द्यावे लागणार हे लक्षात येताचं शासनाने पंचवार्षिक योजना 1951-52 या मध्ये कुंटुंब कल्याण कार्यक्रमाचा अंर्तभुत करुन 1952 पासुन राष्ट्रीय कुंटुंब कल्याण कार्यक्रम अंमलात आणला.  आपणांस ज्ञातचं असेल की, जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत प्र

थक क्रंमाकावर असुन दुस-या क्रंमाकावर चीन देश आहे.  लोकसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे.  वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, गरिबी, अन्न धान्य तुटवडा, निरक्षरता, गर्दी, प्रदुषण, रुग्णालयात रुग्ण वाढ, शिक्षणाचा अभाव,  वाढते शहरीकरणामुळे झाडे कमी परिणामी पाऊस कमी त्यामुळे कोरडा दुष्काळाची वेळ निर्माण होते. नैतिकता व सामाजिकस्तर पातळी खाली जावुन गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये वाढ होते इत्यादी हे केवळ लोकसंख्या वाढीमुळे होत असेल तर यामध्ये चांगल्या दृष्टीकोनातुन या मध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. म्हणुनचं म्हणतात ’लहान कुंटुंब सुखी कुंटुंब.’                                                                                         लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजना, उपक्रम राबविण्यांत येत आहे.  त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रीय कुंटुंब कल्याण कार्यक्रम होय.  शासकिय रुग्णालयातुन कुंटुंब नियोजनाची माहिती व उपक्रम बाबत सांगितले जाते. कुंटुंब कल्याण कार्यक्रमात दोन प्रकारच्या पध्दती आहेत एक कायमची नसबंदी शस्त्रक्रिया व दुसरा प्रकार तात्पुरती कुंटूंब नियोजन पध्दत.  यामध्ये स्त्री, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते व तात्पुरती पध्दतीमध्ये गर्भनिरोधक गोळया, अंतरा इंजेक्शन, कॉपर-टी, निरोध इ. बाबत जनतेतः जागरुकता निर्माण केली जाते.  ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रण वाढीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी लहान कुंटुंबाचे फायदे बाबत जनजागृती, बालविवाह कायदयाची अंमलबजावणी, राष्ट्रीय कुंटूंब कल्याण कार्यक्रमाची माहिती, प्रत्येक कुंटुंबाने परिवार नियोजनाचा सल्ला घेऊन अंमलबजावणी करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे.

आवाहन : लहान कुंटूंब सुखी कुटुंब.

(डॉ. जयश्री भुसारे) जिल्हा आरोग्य अधिकारी

    जिल्हा परिषद, जालना.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे