pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

जालना जिल्हा परिषद समोर मराठवाडा शिक्षक संघाचे धरणे

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.11

जालनाः शासनाच्या विविध ध्येय धोरणाच्या संदर्भातील एकूण २६ मागण्यासाठी गुरूवारी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग जालना यांच्या कार्यालयासमोर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी संपूर्ण मराठवाड्यात हे आंदोलन एकाच दिवशी करण्यासाठी आवाहन केले होते होते.

अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळालेच पाहिजे २) सर्वांना जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे ३) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०, २०,३० ही आश्वासित प्रगती योजना लागू करावी ४) इंग्रजी शाळेतील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात याव्या ५) आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनिमितता दूर व्हायला पाहिजे या व अशा इतर २६ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व यांच्यापर्यंत माध्यमिक बाळासाहेब शिक्षणमंत्री पोहोचवण्यासाठी शिक्षणाधिकारी खरात यांच्यामार्फत जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे व जिल्हा सचिव संजय येळवंते, कोषाध्यक्ष नारायण मुंडे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष फरखुंद अली सय्यद, जिल्हा उपाध्यक्ष जगन वाघमोडे, जिल्हा सचिव संजय येळवंते, केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवटे, जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे व मार्गदर्शक डॉ मारुती तेगमपुरे यांनी आंदोलन कर्त्यांना संबोधित केले. केंद्रीय कार्यकारणी सदस्य आरेफ कुरेशी, उपाध्यक्ष भीमाशंकर शिदे, सहसचिव प्रद्युम्न काकड, प्रसिद्धीप्रमुख हकीम पटेल, भगवान धनगे, गणेश मेहेत्रे, रमेश गाढे, कैलास मांटे विष्णू इप्पर, शिवहारी कायंदे, ज्ञानेश्वर पवार, राधेश्याम चौधरी, विष्णू भाबट, रशीद शेख, संजय चव्हाण, शेख आतिक, अब्दुल करीम, सोहम बोदवडे, इमरान सिद्दिकी, भगवान पालकर, शिरीन बेगम शहा, सुनील पाटील,योगेश टेके, शिवकन्या काळे आदी बहुसंख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे