सुसंवादी, निस्वार्थ सेवाभावी, अभ्यासू,सेवानिवृत्ती प्रा. दत्ता देशमुख टेंभुर्णीकर

जालना/प्रतिनिधी, दि.30
सुसंवादी, निस्वार्थ सेवाभावी, अभ्यासू,सेवानिवृत्ती प्रा. दत्ता देशमुख टेंभुर्णीकर — हे एक सुसंवादी, निस्वार्थ सेवाभावी, अभ्यासू व्यक्तिमत्व, भेटल्यानंतर समोरची व्यक्ती आपलंसं करून घेण्यात ज्याचा हातखंडा आहे असे हे नेतृत्व. माझे गुरुवर्य,इतिहासाचे, समाजशास्त्राचे प्राध्यापक, नुसतेच प्राध्यापक नसून ते गाढे अभ्यासक सुद्धा आहेत. इतिहासाचा सखोल चिकित्सक अभ्यास करून विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात त्यांचा हतखंडा आहे. यांची नवभारत शिक्षण संस्था टेंभुर्णी, द्वारा संचलित पूर्वाश्रमीचे नवभारत हायस्कूल, आत्ताचे श्रीमती जे बी के विद्यालय टेंभुर्णी व नवभारत कनिष्ठ महाविद्यालय टेंभुर्णी . येथे 26 जुलै 1988 रोजी गणिताचे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणारे, आणि बघता बघता सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्राध्यापकांना, तेथील शिक्षकांना तेथील मुख्याध्यापक,प्राचार्यांना आपलंसं करून घेण्यामध्ये त्यांना वेळ लागला नाही. त्या काळातल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत विविध उपक्रमासाठी लागणार ज्ञान हस्तगत करून त्यांच्यासोबत तसेच स्वतः विद्यार्थ्यांप्रती ज्ञान देण्यासाठी सतत धडपडणारे, विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्या सुसंवाद घडवून आणून, विद्यार्थी,. गावातील व्यक्तींची त्यांचा सुसंवाद, आणि सुसंवाद साधण्याची कला, सुसंवाद साधत असतानाच सर्वप्रथम ते त्याच्या अडीअडचणी विचारत असत, अडीअडचणी विचारल्या म्हणजेच तो आपलासा कसा होईल याकडे त्यांचा कल असतो. विद्यार्थी असो व्यक्ती असो नागरिक असो पालक असो भेटल्यानंतर अगदी आनंदी कसा राहील हेच त्यांनी पाहिलं. विद्यार्थ्याला सखोल ज्ञान देण्याबरोबरच, विद्यार्थी वर्गात हसत खेळत कसे राहतील हेच पाहिले. विद्यार्थ्यांना शिकवताना तो विषय कसा समजेल याकडे त्यांचा कल असायचा. विद्यार्थी अभ्यासानंतर मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांमध्ये उत्तरे सोडवण्याची कला कशी आत्मसात करेल याकडेही त्यांचा कल असायचा. सुसंवादी नेतृत्वाचा आज सेवानिवृत्तीचा दिनांक आहे. 31डिसेंबर 2025. नवभारत हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी ला शिकवताना त्यांनी आपला गणित हा आवडीचा विषय निवडला आणि ते विद्यार्थ्यांना गणित शिकू लागले. पाहता पाहता त्यांना विज्ञान इतिहास हिंदी या विषयांचे ही आवड निर्माण होऊन ते विद्यार्थ्यांना याविषयी शिकू लागले. या विभागात पाच वर्षे सेवा केल्यानंतर 1993 मध्ये ते माध्यमिक विभागामध्ये पदोन्नतीने नियुक्त झाले. तिथेही इतिहास हिंदी या विषयाचे ते ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असतानाच भूगोल व अर्थशास्त्र हा विषय सुद्धा अगदी सहज आणि लिलया पद्धतीने शिकू लागले. हे सर्व करत असतानाच त्यांनी, आपले शिक्षण सुद्धा चालू ठेवलेले होते या दरम्यान त्यांनी पदवी मिळवली आणि पदव्युत्तर पदवी मिळवली व, शिक्षण शास्त्रातील महत्त्वाची पदवीही सुद्धा मिळवली. या शिक्षणाच्या जोरावरच संस्थेने त्यांना 1996 पासून संस्थेच्या नवभारत कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून पदोन्नती दिलेली आहे. तेव्हापासून ते कॉलेजला प्राध्यापक म्हणून इतिहास आणि समाजशास्त्र विषय शिकवितात. तसेच त्यांना पर्यावरणाची आवड असल्याने पर्यावरण हा विषय सुद्धा ते उत्तम पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत शिकवितात. ========== समजभान असलेला माणूस:-. शिक्षकी पेशा स्वीकारल्यानंतर शिक्षकाची समाजाची नाळ जोडलेली असते, विद्यार्थ्यांच्या पालक यांच्याशी सुसंवाद जाताना समाजातील अनेक लोकांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला. समाजातील लोकांची समस्या सोडवून घेताना समाजभान कसं राहील याची नितांत भावना त्यांच्या मनामध्ये असते. आणि ती सदोदित जपण्याचं काम, त्यांच्या देशमुख परिवाराकडून वारसा मिळालेला असल्याने समाजभान जपणारा माणूस म्हणून सुद्धा त्यांचा लौकिक आहे. शिक्षकी पेशीमध्ये त्यांनी विविध अंगाने आपलं शिक्षण देणे सुरू ठेवलेले असताना विविध उपक्रम राबविलेले होते. शालेय जीवनामध्ये स्काऊटचे शिक्षण मिळालेल्या देशमुख सरांना स्काऊट या विषयाचे आवड निर्माण झालेली असल्यामुळे त्यांनी स्काऊट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावा म्हणून व विविध उपक्रम स्काऊटच्या माध्यमातून राबवावी म्हणून उत्तम स्काऊट शिक्षक म्हणून सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे, त्यांनी स्काऊट हा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार मिळवून दिले. विविध जिल्हा मेळाव्यामध्ये विभागीय मेळाव्यामध्ये शाळेला विविध बक्षिस सुद्धा मिळवून दिलेली आहेत. माझ्याशी बोलताना त्यांनी स्काऊट बद्दल सांगितले की माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा मला या कामी मदत केलेली आहे. उत्तम हलगी पटू :-. ————=====. शाळेमध्ये लागल्यापासूनच कवायतीची आवड असणाऱ्या देशमुख सरांना त्यांच्या शालेय जीवनात त्यांचे गुरु डिगोळे सरांकडून कवायतीचे शिक्षण घेत असताना हलगीच सुद्धा शिक्षण मिळाले आणि त्यामुळेच त्यांनी प्रयत्नाने हलगी शिकून घेतली आणि विद्यार्थ्यांना हलगीच्या तालावर लेझीम कवायत ला मदत करताना क्रीडा शिक्षकांना मदत करताना, उत्तम हलगीच्या तालावर कवायत शिकवण्यासाठी मदत केलेली आहे. लहानपणापासूनच नाटकाची आवड असल्यामुळे, व या कामासाठी आदर्श शिक्षक शेख जमीर सर यांचं नाट्य दिग्दर्शन त्यांना खूप भावले आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळात, विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात नाटकांत विद्यार्थ्याकडून नाटके सुद्धा बसून घेतलेली आहेत. विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करताना त्यांना उत्तम संचालन कसे करता येईल याकडे त्यांचे लक्ष असायचं आणि ते उत्तम संचालन करतात. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ते एखादी भूमिका घेऊन त्यासाठी स्वतः खर्च करून दरवर्षी एखादी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्यासाठी ते तयार असायचे म्हणजे यामध्ये श्रीकृष्ण, मल्हारी हे त्यांचे गाजलेले भूमिका विशेष होत. प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख यांचा जन्म टेंभुर्णी गावातीलच. 5 डिसेंबर 1967 ला ते टेंभुर्णी त्यांचा जन्म झाला. टेंभुर्णी गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्या शाळेत नोकरी करायला मिळाली त्या शाळेत त्यांची पाचवी ते दहावीचे सर्व शिक्षण पूर्ण झाले. अकरावी बारावी त्यांचे देऊळगावराजा हायस्कूल येथे झाले. व पुढील शिक्षण जालना येथे त्यांनी घेतलेले आहे. हे करत असताना त्यांनी आपली जिद्द सोडलेली नव्हती गरीब परिस्थितीतून पुढे जाऊन कसे शिकावे हे त्यांनी एक आदर्श म्हणून समाजापुढे दाखवून दिलेले होते त्यांनी त्यांच्या या शिक्षकी पेशीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मदत केली आणि हा त्यांचा वारसा त्यांनी पुढे नेलेला आहे. त्यांच्या या शिक्षकी पेशीमध्ये ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून त्यांनी परीक्षक नियामक अभ्यास मंडळाचे सदस्य, वरिष्ठ निवड श्रेणी तसेच विविध प्रशिक्षकाच्या भूमिकेत तालुका जिल्हा राज्य स्तरावर आपलं व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे. हे सर्व करत असताना उत्तम शिक्षक कसा असावा हे त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून सर्व शिक्षकांसमोर आहे. विद्यार्थी त्यांच्यापर्यंत पोहोचला म्हणजे त्याची समस्या सुटली. सु- स्वभाव त्यांचा आहे. त्यांच्याबद्दल बोलावे तितके थोडेच आहे त्यांच्याबद्दल लिहावे तितके थोडेच आहे. त्यांच्या संपर्कात आलेला प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकून जातोच हा त्यांचा स्वभाव अगदी सहज घेण्यासारखा आहे. शालेय जीवनात ती विद्यार्थ्यांना शिकवतात एवढ्यावरच ते थांबलेले नाही. चार चौकटीत शिकून चार चौकटीच्या आतच आपला स्वभाव ठेवावा असा स्वभाव त्यांचा नाही. चौकटी बाहेरचे शिक्षणही विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह असतो. समाजाला ही चौकटी बाहेरचे शिक्षण मिळाले पाहिजे समाज सुद्धा चौकटी बाहेर आला पाहिजे यासाठी त्यांचा नेहमी सातत्याने प्रयत्न असतो. त्यांच्यापासून धातृत्व दानशूरता संयम अशा अनेक गुणांचा संचय त्याच्या मध्ये आहे. ते शिक्षण क्षेत्रातच नाही तर सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा, मग गणेश नागरी च्या माध्यमातून असो, महेश पतसंस्थेच्या माध्यमातून असो. विविध शैक्षणिक संस्था निर्माण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. तेजा शिक्षण संस्थेमध्ये आहे तिथे सुद्धा ते स्वतः संचालक आहेत, महेश शिक्षण संस्थेत सुद्धा स्वतः संचालक आहे, ते महेश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सचिव आहेत. ते दत्त संस्थानचे विश्वस्त आहेत. ते गणपती संस्थानचे विश्वस्त आहे. ते रेणुका माता संस्थानचे सचिव आहेत. विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो. वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत उपाध्यक्ष आहे. या माध्यमातून त्यांनी शिवचरित्र पुष्पांजली या आठ भागातल्या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामध्ये अभ्यासपूर्ण लेखन करण्याची त्यांची कला पुढे आलेली आहे. इतिहास प्रबोधन संस्थेचे ते यावर्षीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. विविध इतिहासिक संस्थानांना भेटी देण्यात त्यांचा पुढाकार झालेला आहे. धुळ्याच्या इतिहास संशोधन संस्थेचे अजून सभासद आहे. समाज बांध राहो म्हणून सामाजिक क्षेत्रातही त्यांचा अग्रेसर आहे. एवढ्यावरच ते थांबलेले नसून पत्रकारितेची आवड असल्यामुळे ते पत्रकार क्षेत्रात सुद्धा कार्यरत आहेत आणि विविध पद्धतीने लिखाण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्याशी संपर्क आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं असतं की शिक्षकी पेशा हा असा आहे की विद्यार्थी पालक तसेच शिक्षण संस्थेची येणारे सर्व घटकांशी संवाद साधण्याची कलाजाच्या जवळ आहे तोच या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो म्हणून माझा नेहमी प्रयत्न असा असतो की, त्या क्षेत्राशी जेवढे घटक आहेत त्या घटकाची सुसंवाद साधणे मग प्रशासनिक बाबीचा असो सामाजिक क्षेत्राच्या बाबीचा असो तो घटक आपण समजावून घेतला पाहिजे. सरांना तालुक्यातीलच नाही, जिल्हा विभाग राज्य लेव्हलवर सुद्धा सरांची अत्यंत ओळख असून अनेक लोक त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. सर्वांना मार्गदर्शन करणारी आहे. ज्यांची सेवा जवळपास 38 वर्षे झालेली असा दांडगा अनुभव ज्याच्याजवळ आहे यांच्याकडून शिकण्यासारखे भरपूर आहे त्यांच्याबद्दल लिखाण करण्यासारखं भरपूर आहे एकदा त्यांच्याशी भेट झाली म्हणजे आपलं जीवन सार्थक होतं असा अनुभव माझा स्वतःचा आहे. मातृभाषेतील शिक्षण घेण्याचा आनंद ते नेहमी बोलून दाखवतात. मातृभाषेतील शिक्षण घेतल्यानेच आपण या स्तरा पर्यंत आलेलो आहे आणि सुसंवाद साधण्यांमध्ये मला कुठेही अडचण आलेली नाही, असेही ते बोलून दाखवतात. लहानपणापासूनच बोलण्याची सवय, त्याचबरोबर आपलंसं करून घेण्याची सवय, वृद्धांशी बोलताना, समवयासकांशी बोलताना असो तरुणांशी बोलताना असो दत्ता आपला आहे, हा भावच सर्वांच्या मनात निर्माण व्हायचा. हीच वृत्ती पुढेही कायम राहिली. विविध पदे भूषविलेली आहेत. इतिहास मंडळाच्या विविध समित्यांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये गुणवत्ता निर्माण करण्याचं काम त्यांनी पूर्ण आपल्या कार्यकाळात केलेलं आहे. त्यांचे अनेक गुण आहेत. वेळेपूर्वी जाणे, विद्यार्थ्यात मिसळणे, विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद साधणे, अडीअडचणी समजावून घेणे, घरगुती अडचणही विद्यार्थ्यांची सोडवण्यामध्ये हातखंडा असलेल्या प्राध्यापक दत्ता देशमुख यांनी खरी प्राध्यापिकी मुलांमध्ये रुजवली. निर्मळ मनाचा प्राध्यापक म्हणूनही त्यांची ओळख आहे. इतकच नाही तर शिक्षकी पेश्या मध्ये शासनाच्या विविध उपक्रमामध्ये सहभागी होण्याचा मानही त्यांना मिळाला. एवढेच नाही तर अत्यावश्यक सेवा म्हणून राबवण्यात येणाऱ्या राज्य मंडळाच्या विविध कामांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शासनाच्या निवडणूक विभागामध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि आजही त्यांना निवडणूक विभागामध्ये काम करण्याची संधी मिळते. आजही अनेक शैक्षणिक संस्था अनेक सामाजिक संस्था अनेक सामाजिक भान असलेल्या व्यक्ती त्यांचा सल्ला घेण्यात कुठली कमतरता समजत नाही. सेवानिवृत्तीच्या पर्यंत आपल्या सेवेमध्ये सेवाभाव कसा राबवावा हे ज्यांनी इतरांना दाखवून दिले. परीक्षक, नियामक, पेपर सेटर तसेच मुख्य नियमांच्या सर्व भूमिका त्यांनी निभावल्या. बोर्डाच्या विविध समित्यांमध्ये सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अशा सेवाभावी वृत्तीचा सुसंवादी प्राध्यापक सेवानिवृत्त होत आहे. विविध संतांनी सांगितलेले आहे की आपल्या कार्यात आपण सतत कार्यमग्न राहिलं पाहिजे. त्या कार्यात येणाऱ्या अडचणीवर मात केली पाहिजे. ही मात करताना कोणाशीही दुजाभाव राहणार नाही ही वृत्ती आपण बाळगली पाहिजे, हा संतांच्या अंगी असलेला भावाचा भावार्थ त्यांनी आपल्या जीवनामध्ये राबवलेला आहे.म्हणूनच पुढील काळात त्यांचा कविता संग्रह सुद्धा येत आहे. तसेच बाजी पासलकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मावळा यावर त्यांचे पुस्तक सुद्धा प्रकाशित होत आहे. या दोन्ही पुस्तकांचे आयएसबीएन नंबर त्यांना मिळालेले असून त्यांचे लिखाण पूर्ण झालेला आहे आणि त्यांचे हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे सेवानिवृत्त होताना एकसुसंवादी प्राध्यापक यांचा सेवानिवृत्ती होत असताना दिसत आहे. ते सेवानिवृत्त होत असताना आपण पुढील कार्यात, पुढील जीवनात हेही सांगायला विसरले नाही की मी पुढील कार्यात सुद्धा असाच राहील व यात प्रगती करून समाजासाठी माझे कार्य थांबू देणार नाही. ज्या सरांनी योगाचंशिक्षण, समुपदेशनाचे शिक्षण, ज्यांच्याकडे सहकार क्षेत्रातील अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग याचं शिक्षण आहे, ज्यांच्याकडे सहकार क्षेत्र धर्मादाय क्षेत्र यामध्ये सखोल ज्ञान आहे ,निवृत्तीनंतर वेळ मिळतो परंतु मी वेळेचं बंधन न पाळता समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी माझ्या सहकारी शिक्षकांसाठी प्राध्यापकांसाठी वेळ देण्याचं काम मी नेहमी करणार आहे. अशा या सुसंवादी सेवानिवृत्ती प्राध्यापकाला सलाम. त्यांनी बोलताना व त्यांच्याशी सुसंवाद साधताना अनेक गोष्टींवर सखोल ज्ञान त्यांच्याजवळ आहे. आणि ते बोलताना म्हणाले की माझ्याशी संवाद करताना समोरच्याची समस्या निराकरण कसे होईल हे मी माझ्या जीवनात आतापर्यंत केलेला कार्य आहे तेही मी पुढे चालू ठेवणार असून विद्यार्थ्यांसाठी सतत मी त्यांचा गुरुजी म्हणून राहण्यात धन्यता मानणार आहे
– चित्रकार, कवी संतोष बाबुराव आवटी,