pub-7425537887339079
[t4b-ticker]
ब्रेकिंग

राजुरवाडी तुळजापूर जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था; प्रवास करणे झाले कठिण प्रशासनाचे होते दुर्लक्ष, दुरुस्ती करण्याची मागणी‎

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

मोर्शी/प्रतिनिधि,दि.30

राजुरवाडी जोडणाऱ्या रस्त्यांची पूर्ण वाट लागली आहे. या मार्गावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.रोड वर मोठ मोठे खड्डे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

गाव तेथे रस्ता असे शासनाचे ब्रीद आहे आणि म्हणूनच राजुरवाडी रस्त्याला जोडली असली तरी रस्ता बांधकाम पुर्ण झाल्यानंतर त्या रस्त्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे या मार्गाची चाळणी झाली आहे. सोबतच रस्त्याच्या दुतर्फा झुडुपांची अपघाताची शक्यता बळावत आहे. पायदळ चालणेही दुरापास्त होत असल्याचे मोर्शी तालुक्यात पहावयास मिळत आहे. राजुरवाडी गावाला कृषी कार्यालय, बँक, महाविद्यालय, शासकीय ग्रामीण रुग्णालय व मुख्य बाजारपेठ आहे.त्यामुळे कार्यालयीन कामासाठी नागरीक, शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात आवागमन आहे. ग्रामीण रुग्णालय असल्याने उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात येत असतात आहे. परंतु रस्ते अत्याधिक प्रमाणात दयनीय अवस्थेत असल्याने रुग्ण रस्त्यातच दगावल्याच्या घटना सुध्दा घडल्या आहे. तर रस्ते खराब असल्यामुळे रस्त्यातच प्रसूती झाल्याची माहीती आहे.तालुक्यातील अनेक रस्त्यावर अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढीस लागले असुन या अपघातांना जबाबदार कोण हा प्रश्न सुध्दा नागरिकात बोलल्या जात आहे. वनसंपदेनी नटलेल्या या तालुक्यात शेतकरी शेतमजुरांची संख्या सुध्दा मोठ्या प्रमाणात असुन वन परिसरात वास्तव्य करणारे शेतकरी शेतमजुर आहेत.

हे रस्ते झाले खराब, दुरुस्तीची मागणी

तालुक्यातील राजुरवाडी तुळजापूर निंभार्णी शिवरा रस्ता वगळता अश्या अनेक गाव खेड्याना जोडणाऱ्या रोड ची वाट लागली आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी तर पूर्ण गिट्टी उखळली आहे. ग्रामीण भागतील संवेदनशील काही नागरिक निवेदने देतात पन त्या निवेदनाकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे नागरिक वैतागले असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या नशिबी चांगले रस्ते मिळू नये ही शोकांतिका आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे