pub-7425537887339079
[t4b-ticker]
संपादकीय

पत्रकारांना वर्तमान पत्रात दिवाळी जाहिराती किती दिल्या यावर ठरणार भावी उमेदवार यांचे भविष्य…….गजानन नारायण वानखेडे

राजकारण एक दशा, समाजकारण ची दिशा आणि पत्रकारांची आशा......

[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

यवतमाळ, दि.20

स्थानिक स्वराज्य संस्था,नगर परिषद यांच्या निवडणूक जाहीर होताच सर्व कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले, कधीच जनतेचे कोणतेही कामे न केलेले आणि कधी च नेत्यांचे नाव सुद्धा कानावर पडलेले भावी उमेदवार आज काल प्रत्येक ग्रुप वर आपला लांबलचक एक पैशाच्या पोस्टर वर परिचय देऊन आपला जनसेवक म्हणून नावलौकिक मिळवत आहे. पत्रकार यांनी दिवाळी जाहिरात वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्यासाठी मागितली असता, कार्यकर्ते यांनी फोन सुद्धा उचलण्यास तयार नव्हते, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी गरीब आहे, आपण लहान माणसं अशी उडवा उडवी ची उत्तरे मिळाली, आज काल पत्रकारिता करताना चौथा स्तंभ यांना आप आपले दिवाळी जाहिरात टार्गेट पूर्ण करावे लागते, त्यासाठी सर्वच पत्रकार बंधू हक्काने दिवाळी ला सर्व नेते, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, माजी आमदार, खासदार, सभापती, अध्यक्ष यांना दिवाळी विशेषांक साठी जाहिराती मागतात, पण आम्ही एवढ्या पत्रकार यांना जाहिराती देऊ शकत नाही, एका जणाला दिली की सर्वांनाच जाहिरात दयावी लागते, अशी प्रतिक्रिया मिळाली.
आज काल नेते सुद्धा भरपूर झाले मग त्यानुसार पत्रकार यांची सुद्धा संख्या वाढणारच आहे. एखादा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रम मध्ये स्वतः हजर राहून पत्रकार बातमी तयार करतात, बाहेरगावी असले तर पत्रकार बंधू ना फोन करून बातमी मागवून घेतात व दुसऱ्याच दिवशी बातमी प्रकाशित करतात, एवढे तत्पर पत्रकार असतात, पण काही नेत्यांना किंमत नसते.
आज कितीही डिजिटल युग येऊ द्या, व्हाट्स अप, फेसबुक वर नेते प्रसिद्ध होण्याचा प्रयत्न करतात, पण मजा तेव्हाच येते एखाद्या शंभर शब्दाच्या बातमी मध्ये एखाद्या कार्यकर्ता यांचे नाव पत्रकार चमकवतो. ही चौथ्या स्तंभची कार्यतत्परता आहे. एका फोन वर सरपंच, अधिकारी, संचालक,जि. प. सदस्य, नगरध्यक्ष, नगरसेवक, यांची बातमी पत्रकार लावतात पण दिवाळी जाहिरात मागितली तर फोन सुद्धा उचलत नाहीत. निवडून येयाच्या अगोदर म्हणतात एखादे पद येऊ द्या, सत्ता येऊ द्या मग जाहिरात देऊ, अन निवडून आले की म्हणतात मी कोणालाच जाहिराती देत नाही, भरपूर पत्रिका आल्या आहेत, असे सांगतात.
प्रत्यक्ष दिवाळी अंक पेपर बघितला असता कोणत्याच नेत्यांनी जाहिराती दिलेल्या नसतात अन जाहिरात मागण्यासाठी गेलं की म्हणतात किती जणांना जाहिराती देऊ इकडे बघितलं तर एकूण दहा पत्रकार यांना सुद्धा जाहिराती दिलेल्या नसतात.
पत्रकार छोटा असो की मोठा पण विचाराने निष्पक्ष, निर्भीड, प्रखर मत मांडून बातमी प्रसिद्ध करतो, इचू छोटा असो की मोठा पण दंश केल्यावर विष सारखेच असते एवढे मात्र नक्की. मग अंक असो, यु ट्यूब चॅनेल असो, साप्ताहिक असो, मासिक असो, वर्तमान पत्राची पिडीएफ अंक असो, शेवटी लोकशाही च्या चौथ्या स्तंभ म्हणून पत्रकार यांची ओळख आहे.
जरी पत्रकार गरीब असले तरी विचारांनी श्रीमंत आहेत अनेक नेत्यांना साध्या पत्रकारांनी उच्च पदावर नेले अन नेत्यांनी भ्रस्टाचार करून पद गमावली पण कोणत्या पत्रकार यांनी कधी आपली लेखणी गमावली नाही, स्वतंत्र पणे अगदी बिनधास्त लिखाण करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं कार्य पत्रकार संपादक करतात. अन नेते निवडून आले की पि. ए. यांना फोन उचलण्यास सांगतात, बारा ही महिने पि. ए. च बोलतात की साहेब मिटिंग मध्ये आहेत, सर मुंबई ला गेले, दिल्ली ला आहेत, निरोप कळवतो असे उत्तरे ऐकायला मिळतात, कधी मधी एखाद्या कार्यक्रमात आले तर वेळेवर येतात स्टेज वर बसतात, कार्यक्रम झाला की लगेच ए. सी. गाडीत बसतात कधी जनतेला समस्या विचारणार त्यांना माहित आहे मी निवडून आलो आता जनतेला विसरले तरी काही हरकत नाही.
पण खरी जनतेची सेवा करून भर पाण्यात सुद्धा स्वतः हजर राहून, दिवाळी ला गोरगरीब जनतेला कपडे, राशन किट, वाटप करून गरीबाच्या झोपडीत पणती लाऊन त्यांचे जिवन सुखकर करणारे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघणारे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे आदरणीय संतोष भाऊ बांगर साहेब यांना मानाचा मुजरा दोनदा गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घेऊन आमदार झाले यांना म्हणतात समाजसेवा.
बघू या निवडणुकीत किती नेत्यांना पद, सत्ता देयाची, खुर्ची कोणाला देयाची याचे 25%तरी पत्रकार यांच्या लेखणीवर अवलंबून आहे.

गजानन नारायण वानखेडे

बि. ए. डी. एड. कॉम्पुटर & टायपिंग.(मरसुळकर) युवा पत्रकार दैनिक हिंदुसम्राट उमरखेड तालुका प्रतिनिधी जिल्हा यवतमाळ.मो. नं. 9096746518……..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे