जालना शहरात गुंठेवारी अधिनियम लागू करून पक्की घरे नियमित करून देण्यात यावी- सौ संध्या संजय देठे
जालना/प्रतिनिधी, दि.28
आज (दि.28) रोजी सौ संध्या संजय देठे नगरसेविका जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा
यांनी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष जी खांडेकर यांची प्रत्यक्षात भेट घेऊन निवेदन देऊन जालना शहरातील प्रलंबित विविध विषयावर लक्ष वेधले
1] जालना शहरांमध्ये गुंठेवारी अधिनियम कायदा लागू करून पक्के घरी नियमित करून देण्यात यावी
2] जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा व जनावरांचा बंदोबस्त करावा
3] महात्मा गांधी चौक रेल्वे स्टेशन रोडवरील विद्युत पोल तात्काळ हटून अपूर्ण असलेला रस्ता पूर्ण करण्यात यावे
4] महात्मा गांधी चौक ते मुक्तेश्वर द्वार पर्यंत उघडलेला सिमेंट रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा
5] जन्म मृत्यू नोंद विलंब शुल्क कमी करण्यात यावे
जालना शहरातील प्रलंबित समस्येवर तात्काळ कारवाई करावी असे लेखी निवेदन देऊन श्री संतोष खांडेकर यांच्याशी चर्चा केली
———————————————————–
सहाय्यक नगररचनाकार रत्नमाला शिंदे
नगररचना विभागातील संजय भालेराव श्री जामदार यांना तात्काळ गुंठेवारी अधिनियम लागू करण्यासाठी शहरातील संबंधित परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन कारवाई करण्याचे आदेश श्री आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे


