मंथन बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
जालना/प्रतिनिधी, दि.29
जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये रविवार रोजी मंथन वेल्फेअर असोसिएशन तर्फे आयोजित मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा, नवोदय पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा व जिल्हा डिक्शनरी प्रोजेक्टमध्ये क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सीमा निकाळजे(विभाग प्रमुख, प्रशासन विभाग, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना) , डॉ. नंदकिशोर डंबाळे ( प्राध्यापक गोल्डन जुबली स्कूल जालना ), प्रा. भरत सूर्यवंशी (अधिव्याख्याता डायट जालना) यांची उपस्थिती होती.
2025 मध्ये नवोदयस पात्र ठरलेल्या वेदिका उबाळे आदित्य भोरे, आनंद खरात, शौर्य मस्के यांचा सत्कार करण्यात आला तसेच डिक्शनरी प्रोजेक्टमध्ये जिल्ह्यातून प्रथम दिव्या आशिष राऊत
द्वितीय मानसी मिलिंद काळे व तृतीय
पियुष माणिक राठोड यांचा सत्कार करण्यात आला.
विभागीय स्तरांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या दिव्या प्रकाश शेळके हिचा सत्कार करण्यात आला.
जालना केंद्रातून ट्रॉफी मिळवणारे विद्यार्थी
ईशा काकडे,आनंदी शेवाळे,राघव इंगळे, श्रीनिधी जाधव, स्वरूप वडगावकर,हर्षल पैठणे, श्रद्धा खैरे,प्रांजल पोहेकर,साई साबळे,प्राची डोखळे,उत्कर्ष टेकाळे,मानसी काळे,आदित्य जाधव,शौर्या भडांगे,शौर्य लोदवाल, संस्कृती घोंगडे,वेरोनिका खंडागळे,उत्कर्षा इंगळे.
उटवद केंद्रातून ट्रॉफी मिळवणारे विद्यार्थी
नचिकेत मराठे,स्वरूप वायाळ,धनंजय घाटे,साईराज खांडेभराड
रांजणी केंद्रातून ट्रॉफी मिळवणारे विद्यार्थी
देवश्री भिवरे,विराज धनावडे,तनुजा पोकळे,श्रेयस सोसे,अनुष्का कांबळे,प्राशुं वावरे,संस्कार वाघमारे,समर्थ इघरे संभाजी सोसे,साक्षी यादव,विद्या यादव, समृद्धी सुरनर राजूर केंद्रातून ट्रॉफी मिळवणारे विद्यार्थी
आर्यन कोळेकर, वेदांत जटाले,रुषिकेश पिंपळे, पुष्कर लोखंडे, शिवम तांबेकर, काव्या जगनाडे, कोमल सहाने, गोपाळ तांबेकर, आर्यन बनकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता देशपांडे यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कॉलर्स अकॅडमीच्या वर्षा खंडागळे,श्रद्धा सोलाट, सुनिता मॅडम , सुभाष इंगळे, प्रकाश शेळके, दीपक लोदवाल यांनी सहकार्य केले.


