ब्रेकिंग
भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट
[wps_visitor_counter]
[sp_wpcarousel id="1375"]
[wps_visitor_counter]
[metaslider id="1367"]
pub-7425537887339079
भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष श्री. भास्कर आबा दानवे यांनी आज जालना महानगरपालिका क्षेत्रातील योगेश नगर व महादेव मंदिर भागाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, सांडपाण्याचा निचरा, वीजपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधा संदर्भातील अडचणी नागरिकांनी श्री. दानवे यांच्यासमोर मांडल्या. या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांनी तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी भाजपचे पदाधिकारी सिद्धिविनायक मुळे, गोवर्धन कोल्हे, सुनील पवार, सुमित सुरडकर, गोपाळ कदम आदी उपस्थित होते.
या भेटीत परिसरातील महिला मंडळाचाही सक्रिय सहभाग होता. गुढे आई, फलके ताई, जुंबड ताई, रामदासी आई, राठोड ताई, कोरडे ताई, खरात ताई, जाधव ताई, गायकवाड ताई, चव्हाण ताई यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.
श्री. दानवे यांनी परिसरातील प्रश्नांचा स्थायी नायनाट करण्यासाठी महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून लवकरच ठोस पावले उचलण्यात येतील, असे सांगितले.